Kondhwa Yevalewadi Ward Office | कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने सेवकासाठी आरोग्य शिबीर आणि पुस्तकांचे ग्रंथालय
Pune PMC News – (The Karbhari News Service) – मुख्यमंत्री यांचे निर्देशानुसार १०० दिवसांचा ७ कलमी कृती आराखड्याच्या अनुषंगाने व कामगार दिन व कोंढवा येवलेवाडी कार्यालयाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महापालिका सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांचे संकल्पनेतून कार्यालयातील सेवकांना पुस्तकांचे ग्रंथालय तयार करणेत आले आहे.सध्याच्या संगणक व इंटरनेटच्या युगामध्ये सुद्धा वाचनाचे स्थान अबाधित असून, वाचनामुळे मेंदूचा व्यायाम व्हावा. त्यांची एकाग्रता वाढावी. सातत्याने वाचन केले तर आपल्यामधील आत्मविश्वाेस कसा वाढतो. वाचनाने डोळ्यावर येणारा ताण हा टि.व्ही. व कॉमप्युटरकडे बघून येणाऱ्या ताणापेक्षा खूपच कमी असल्याने या सर्व बाबी सेवकांकरिता आवश्यक असल्याने कोंढवा येवलेवाडी कार्यालयाच्या तळमजल्यावर ७०० ते ८०० पुस्तकांचे ग्रंथालय अतिशय छोट्या जागेत तयार करणेत आले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

सेवकांच्या मानसिक स्थिती बरोबरच त्यांची शारीरिक स्थिती देखील उत्तम राहावी याकरिता पुणे महानगरपालिका व बाळासाहेब देवरस पॉलीक्लीनिक, ASG. Eye Hospital व Krsnna Diagnostic Ltd. यांचे सयुंक्त विद्यमानाने कोंढवा येवलेवाडी कार्यालयाकडील सेवकांकरिता आरोग्य शिबीराच आयोजन करणेत आले होते.
दिनांक २८.०४.२०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता उपरोक्त दोन्ही कार्यक्रमाचे उद्घाटन मा.समुपदेशक लेखक, व्याख्याता डॉ.श्री.दत्ताजी कोहिनकर, मराठी भाषेचे प्रसारक व ज्येष्ठ व्याख्याते श्याम भुरके , जयंत भोसेकर ,उप आयुक्त ,परिमंडळ कार्यालय क्र.४,पुणे मनपा., संदीप कदम ,उप आयुक्त , घनकचरा व्यवस्थापन, नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी यांच्या शुभ हस्ते करण्यात येऊन एका चांगल्या सामाजिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
२८.०४.२०२५ हा सेवा हक्क दिन असल्याने कार्यालयाकडील अधिकारी/कर्मचारी यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत शासनाच्या सेवा पारदर्शक पद्धतीने विहित कालमर्यादेत व सौजन्याने पूर्ण करण्याची शपथ घेण्यात आली तसेच सदर उपक्रम प्रसंगी कंत्राटी सफाई कामगारांना ई पहचान कार्ड वितरण करणेत आले.
कोहिनकरांनी उपस्थिताना विविध संतांचे व महान पुरुषांचे संदर्भ देऊन स्वतःवर प्रेम करून शरीर निरोगी ठेवणेचे महत्व खूप सध्या व सुंदर शब्दात समजून सांगितले.
मा.भूरूक यांनी तंटा मुक्त जीवन कसे जगावे,यशस्वी जीवन कसे जगावे याबाबत आयुष्याचा कानमंत्र दिला.
मा.केंजळे यांनी सर्व कामगारांना ई.एस.आय.चे महत्व पटवून दिले. तसेच वाचाल तर वाचाल या उक्तीचा आपल्या जीवनावर किती मोठा परिणाम होतो याबाबत सेवक त्यांच्या पगार पावतीचे वाचन करत नाही तसेच विविध सूचना वाचत नाहीत त्यामुळे ते विविध फायद्या पासून कसे वंचित राहतात या बाबत समजावून सांगितले.
सदर कार्यक्रम प्रसंगी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेबाबत मा.समुपदेशक लेखक, व्याख्याता डॉ.श्री.दत्ताजी कोहिनकर व मराठी भाषेचे प्रसारक व ज्येष्ठ व्याख्याते श्याम भुरके, जयंत भोसेकर ,उप आयुक्त ,परिमंडळ कार्यालय क्र.४,पुणे मनपा. ,संदीप कदम उप आयुक्त , घनकचरा व्यवस्थापन, नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी व बाळासाहेब देवरस पॉलीक्लीनिक, ASG. Eye Hospital व Krsnna Diagnostic Ltd.,अपेक्स कमिटीचे मेंबर श्री.मंदार वेदक, मोहल्ला कमिटीच्या श्रीमती नेराळे यांचे स्वागत करून सर्व मान्यवरांचा शाल,श्रीफळ व पर्यावरणपूरक झाडाचे रोप असलेली कुंडी देवून सत्कार करणेत आला.
सदर प्रसंगी या कार्यालयाकडील वैद्यकीय अधिकारी डॉ.रश्मी जाधव, उप अभियंता श्रीमती राखी चौधरी,प्रशासन अधिकारी श्री.सुनील मोरे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री.राजू दुल्ल्म,
जालिंदर कदम, अधिक्षक श्री.जीवन मराळे,उप अधिक्षक मोनिष बधे यांचे सह सर्व मोकादम,आरोग्य निरीक्षक ,सर्व सफाई कर्मचारी व कार्यालयातील सर्व आजी माजी अधिकारी /कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. आरोग्य शिबिराच्या विविध चाचण्यांचा एकूण ३५० सेवकांनी लाभ घेतला.

COMMENTS