PMC Water Supply Department | पाणीपुरवठ्याच्या तक्रारी बाबत आता अभियंत्यावर जबाबदारी निश्चित केली जाणार   | पाणीपुरवठा विभागाचा निर्णय 

Homeadministrative

PMC Water Supply Department | पाणीपुरवठ्याच्या तक्रारी बाबत आता अभियंत्यावर जबाबदारी निश्चित केली जाणार  | पाणीपुरवठा विभागाचा निर्णय 

Ganesh Kumar Mule Apr 24, 2025 9:03 PM

Shrinath Bhimale PMC Standing Committee Chairman  | स्थायी समिती अध्यक्ष पदी श्रीनाथ भिमाले यांची बिनविरोध निवड !
PMC Ward No 2 | प्रभाग दोनच्या नागरी प्रश्नावर अधिकारी ‘ऑन चार्ज’
Pune Municipal Corporation Retired Sevak Sangh | मागण्यांवर अंमल करा अन्यथा 6 सप्टेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन .!  | पुणे महानगरपालिका निवृत्त सेवक संघाचा मनपा प्रशासनाला इशारा 

PMC Water Supply Department | पाणीपुरवठ्याच्या तक्रारी बाबत आता अभियंत्यावर जबाबदारी निश्चित केली जाणार

| पाणीपुरवठा विभागाचा निर्णय

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पाणीपुरवठा विभागाकडील कार्यरत सर्व कनिष्ठ अभियंता आणि उप अभियंता यांची नेमणूक पाणीपुरवठा झोननुसार केली जाणार आहे.

समान पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत पुणे शहराचे १४३ झोन करून, त्यानुसार हायड्रोलिक डिझाईन तयार करून प्रकल्पीय कामे सुरु आहेत. सध्या सर्व कनिष्ठ अभियंता आणि उप अभियंता यांचे कार्यक्षेत्र हे प्रभागानुसार ठरवून देण्यात आलेले आहे. त्यामुळे एका कनिष्ठ अभियंत्याकडे काही पाणीपुरवठा झोन पूर्णपणे आणि काही झोन काही भागामध्ये येत आहेत. त्यामुळे टाकीला पुरवठा करण्यात येणारे पाणी आणि वितरण याचे नियोजन करणे अडचणीचे होत आहे. तसेच, एखाद्या भागामध्ये पाणीपुरवठ्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाल्यास यामुळे जबादारी निश्चित करणे अडचणीचे होत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.  (Pune Municipal Corporation – PMC)

याबाबत पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (Nandkishor Jagtap PMC) यांनी आदेश जारी केले आहेत. सर्व कार्यकारी अभियंता यांना हे आदेश देण्यात आले आहेत.

आदेशात म्हटले आहे कि, समान पाणीपुरवठा प्रकल्प योजनेनुसार प्रत्येक पाणीपुरवठा झोनचे झोन आयसोलेशन करणे, पाणी वापरावर नियंत्रण आणण्यासाठी १३५ लिटर प्रतीदिन/प्रती माणसी नुसार पाणीपुरवठा करणे, तसेच झोनमधील NRW कमी करणे, टाकीचे इनलेट नुसार पाणी वितरण नियंत्रित करणे, इत्यादी कामे संबंधित वितरणाचे अभियंता यांनी संबंधित प्रकल्प विभागाच्या अभियंता यांचेशी समन्वय ठेऊन करणे आवश्यक आहे.

यासाठी सध्याच्या प्रभागनिहाय कनिष्ठ अभियंता आणि उप अभियंता यांची केलेली नेमणूक पाणीपुरवठा झोननिहाय करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक पाणीपुरवठा झोनच्या kml files प्रकल्प विभागाकडून प्राप्त करून घ्याव्यात. सदर पाणीपुरवठा झोनच्या हद्दीमध्ये वेळोवेळी काही बदल झाले असल्यास त्यानुसार अद्ययावत करून घेण्यात याव्यात.  संबंधित कार्यकारी अभियंता यांनी आपल्या अधिनस्त उप अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रातील नियोजित पाणीपुरवठा प्रकल्पीय झोननुसार कामकाजाबाबत आदेश निर्गमित करावेत आणि त्याची एक प्रत आमच्याकडे पाठविण्यात यावी. यानुसार कामकाज दिनांक १ मे, २०२५ पासून सुरु करण्यात यावे. असे आदेशात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: