Pune Municipal Corporation | पुण्याचे पहिले महापौर आणि आयुक्त यांचे पुतळे बसवण्यासाठी विविध सरकारी कार्यालयांची पुन्हा घ्यावी लागणार परवानगी!
| शहर सुधारणा समिती समोर प्रस्ताव
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुण्याचे पहिले महापौर कै. बाबुराव सणस (Punes First Mayor Baburao Sanas) व पुणे महानगरपालिकेचे पहिले आयुक्त स.गो. बर्वे (PMCs First Municipal Commissioner S G Barve) यांचे पुतळे पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या (PMC Main Building) आवारामध्ये बसवण्यात येणार आहेत. मात्र त्यासाठी विविध सरकारी कार्यालयांचे आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र (NOC) पुन्हा एकदा घ्यावे लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव शहर सुधारणा समिती (PMC City Improvement Committee) समोर ठेवण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
पुण्याचे पहिले महापौर कै. बाबुराव सणस व पुणे महानगरपालिकेचे पहिले आयुक्त स.गो. बर्वे यांचे अर्धपुतळे पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या आवारामध्ये बसवण्यात येणार आहेत. याबाबत माजी उपमाहपौर आबा बागूल यांनी प्रस्ताव दिला होता. हे पुतळे बसविणेस पुणे महानगरपालिका मुख्य सभेने २९ ऑगस्ट २०१८ रोजी मान्यता दिली होती. पुतळे बसविण्यासाठी चौथरा देखील तयार करण्यात आला आहे. सणस यांच्या कुटुंबियांनी पुतळा देखील महापालिकेस दिला आहे.
त्यानुसार मुख्य वास्तुशास्त्रज्ञ, महाराष्ट्र राज्य, कला संचालक, कला संचालनालय, पोलिस आयुक्त, पुणे शहर, अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम, तहसिलदार, पुणे शहर आणि पोलिस निरिक्षक, शिवाजीनगर वाहतुक विभाग, पुणे शहर या विभागांचे ना हरकत प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे. या पैकी पोलिस आयुक्त (पुणे शहर), अधिक्षक अभियंता (सार्वजनिक बांधकाम), तहसिलदार (पुणे शहर), पोलिस निरिक्षक (शिवाजीनगर वाहतुक विभाग) या विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
मात्र महाराष्ट्र शासनच्या नियमा नुसार ना-हरकत प्रमाणपत्र व पारित केलेले ठराव एक वर्षापेक्षा अधिक जुने असू नयेत. त्यामुळे पुतळे बसविण्यासाठी पुनश्च सर्व कार्यालयास पत्रव्यवहार करावा लागणार आहे. यासाठी मुख्य सभेची याकामी पुन्हा मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यानुसार भवन विभागाने हा प्रस्ताव शहर सुधारणा समितीच्या माध्यमातून मुख्य सभेसमोर ठेवला आहे.
——
COMMENTS