Pune PMC News | विकास कामांची बिले २९ मार्च पर्यंतच सादर करता येणार | ठेकेदार संघटनेच्या मागणीला यश 

Homeadministrative

Pune PMC News | विकास कामांची बिले २९ मार्च पर्यंतच सादर करता येणार | ठेकेदार संघटनेच्या मागणीला यश 

Ganesh Kumar Mule Mar 20, 2025 6:23 PM

Public libraries | सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानात ६० टक्के वाढ
Maharera | ‘महारेरा’मुळे बांधकाम क्षेत्रातील पारदर्शितेत वाढ | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Vidhansabha Election Pune | पुण्यात काँग्रेस कडून रविंद्र धंगेकर, तर शरद पवार यांच्या पक्षाकडून प्रशांत जगताप, बापूसाहेब पठारे यांना संधी

Pune PMC News | विकास कामांची बिले २९ मार्च पर्यंतच सादर करता येणार | ठेकेदार संघटनेच्या मागणीला यश

 

Pune Municipal Corporation – (The Karbhari News Service) – महापालिकेच्या विविध विभागाकडून आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपत असतानाही अखेरच्या दिवसापर्यंत कामाची बिले सादर करतात. यामुळे या महिन्यात प्रमाणाबाहेर खर्च झालेला दिसतो. हे प्रकार बंद करण्यासाठी महापालिका आयुक्त यांच्याकडून २४ मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र क्षेत्रीय कार्यालयांची संख्या आणि व्याप्ती पाहता ठेकदार संघटनांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार २९ मार्च पर्यंत मुदतवाढ सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि १ ते ५ परिमंडळ साठी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांनी जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

पुणे महानगरपालिका प्रशासनाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये विविध विकास कामांसाठी अंदाजपत्रकीय तरतूदी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात मोठ्या प्रमाणात देयके अदा करण्यासाठी सादर केली जातात. त्यामुळे या महिन्यात प्रमाणाबाहेर खर्च (Rush of Expenditure) झालेला दिसतो. ही बाब वित्तीय नियमांशी विसंगत असून प्रशासकीय दृष्ट्याही उचित नसल्याने सन २०२४- २५ या आर्थिक वर्षात तरतूद केलेल्या कामांची देयके २४ मार्च पर्यंत सादर करण्याचे  निर्देश देण्यात आले होते. महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी हे आदेश जारी केले होते.  आयुक्तांनी आदेशात म्हटल होते कि, या मुदतीत बिला सोबत सादर करावयाच्या सर्व आवश्यक कागदपत्रासंह परिपूर्ण असे देयक सादर करण्यात यावे. अपूर्ण कागदपत्रासह देयक सादर केल्यास व त्यामुळे देयक अदा करण्यास विलंब झाल्यास किंवा तरतूद व्यपगत झाल्यास त्याचे संपूर्ण दायित्व व जबाबदारी संबधित खात्याची, विभागाची राहील. याबाबत कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. असे आयुक्तांनी स्पष्ट केले होते.

मात्र ही मुदत अपुरी आहे. कारण सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि परिमंडळ यांच्या कामाची व्याप्ती पाहता मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे. अशी मागणी ठेकेदार आणि ठेकेदार संघटनांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त आणि शहर अभियंता यांच्याकडे केली होती. ठेकेदारांच्या मागणीला अखेर यश आले आहे. बिले सदर करण्यासाठी आता २९ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र ही मुदतवाढ सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि परिमंडळ साठी असणार आहे. असे उल्का कळसकर यांनी काढलेल्या आदेशात म्हटल आहे.


विकास कामांची बिले सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबतआम्ही  महानगरपालिका अतिरिक्‍त आयुक्त  पृथ्वीराज बी पी, शहर अभियंता प्रशांत वाघमारे  तसेच मुख्य लेखा वित्तीय अधिकारी उल्का कळसकर  यांना निवेदन दिले होते. या संपूर्ण प्रकरणी सकारात्मक चर्चा झाली व प्रशासनाच्या वतीने लवकरच भूमिका जाहीर करू असे सांगण्यात आले होते. त्यानुसार मुदतवाढ मिळाली आहे.

  • विशाल भोसले, ठेकेदार.