PMRDA | पीएमआरडीएच्या श‍िल्लक गाळे, रो हाऊसचा ई-लिलाव

Homeadministrative

PMRDA | पीएमआरडीएच्या श‍िल्लक गाळे, रो हाऊसचा ई-लिलाव

Ganesh Kumar Mule Mar 03, 2025 7:34 PM

PMRDA Draft DP |  Why was PMRDA’s draft development plan postponed while it was awaiting approval?
Aashadhi Wari Palkhi Sohala | वारकऱ्यांना कोणतीही असुविधा होणार नाही याची दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी | आगामी आषाढी वारीच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न
Indefinite Strike | Old pension | संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार

PMRDA | पीएमआरडीएच्या श‍िल्लक गाळे, रो हाऊसचा ई-लिलाव

 

Pune PMRDA – (The Karbhari News Service) –  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एकूण श‍िल्लक असलेल्या २२ गाळे आण‍ि ४ रो हाऊस यांचा ई-लिलाव करण्यात येत आहे. यासाठी इच्छुक नागरिकांकडून ३ मार्च २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजेपासून ते २४ मार्च २०२५ रोजी सायंकाळी पाचपर्यंत ऑनलाईन अर्ज मागव‍िण्यात येत आहे.

प्राधिकरणाच्या पेठ क्र. ३०, Convenience Shopping Centre मधील उर्वरीत ५ व्यापारी दुकाने ज्यांची किंमत १२,६५,२९२/- ते १९,८१,६७१/- या दरम्यान असून पेठ क्र. १२ मधील गृहयोजना क्र. १ व २ मधील उर्वरीत १६ व्यापारी दुकाने ज्यांची किंमत ९,४८,१२३/- ते २०,७७,०३७/- आहे. पेठ क्र. ४ मधील दुकान क्र. ६ मधील १ दुकानाची किम्मत ४३,८२,३५१/- इतकी असून सदर दुकान अनुसुचित जमाती (ST) प्रवर्गासाठी आरक्ष‍ित आहे. यासह पेठ क्र. ६ मधील ४ रो हाऊस असून रो हाऊस क्र. ए-५ ची किंमत १,२४,९६,५९६/-, रो हाऊस क्र. बी-६ ची किंमत १,२४,७३,४८८/-, रो हाऊस क्र. ए-८ ची किंमत १,२४,७९,९३७/- व रो हाऊस क्र. बी -८ ची किंमत १,४२,७५,५२९ इतकी आहे. एकूण २२ गाळे, ४ रो हाऊस यांचा ई-लिलाव करण्यात येत असून इच्छुक नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://eauction.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. जास्तीत जास्त नागरिकांनी मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावेत असे आवाहन महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहेत.

अधिक माहितीसाठी – Helpline No.- ०२०-२७१६६०००