E-Governance Index PMC Pune | ई-गव्हर्नन्स निर्देशांकात पुणे महापालिकेचा प्रथम क्रमांक

Homeadministrative

E-Governance Index PMC Pune | ई-गव्हर्नन्स निर्देशांकात पुणे महापालिकेचा प्रथम क्रमांक

Ganesh Kumar Mule Jan 22, 2025 7:43 PM

Pune Municipal Corporation’s ranking in health schemes has moved from 4th to 3rd
E Rickshaw | Pune Municipal Corporation | दहा महिला चालकांना ई-रिक्षा खरेदीसाठी लोकसहभागातून अर्थसहाय्य | पालकमंत्री
Kasba Constituency Civic Issues | कसबा मतदारसंघातील नागरी समस्यांचे निवारण करण्यासाठी महापालिका आयुक्ताकडे मागणी 

E-Governance Index PMC Pune | ई-गव्हर्नन्स निर्देशांकात पुणे महापालिकेचा प्रथम क्रमांक

 

Pune Municipal  Corporation – (The Karbhari News Service) – सेवा, पारदर्शकता आणि उपलब्धता या तीन निकषांवर काडण्यात आलेल्या राज्यातील २९ महापालिकांच्या ई-गव्हर्नन्स निर्देशांकात (E Governance Index) पुणे महापालिकेने (Pune Municiapl Corporation – PMC)  प्रथम क्रमांक मिळवला आहे. महापालिकेचे अधिकृत संकेतस्थळ, मोबाइल अॅप आणि समाज माध्यम खात्यांनी संबंधित माहितीवर आधारित हा निर्देशांक निश्चित करण्यात आला आहे. त्यामध्ये पुणे महापालिकेने (PMC Pune) १० पैकी ८.२२ गुण प्राप्त केले आहेत. (Pune PMC News)

पॉलिसी रिसर्च ऑर्गनायजेशन (Policy Research Organisation) या संस्थेतर्फे दरवर्षी राज्यातील महापालिकांच्या ई-गव्हर्नन्सचा आढावा घेतला जातो. यावर्षी घेण्यात आलेल्या आढाव्यात उपलब्धता, सेवा आणि समाज माध्यम वापर या मापदंडांशी संबंधित एकूण गुणांच्या निकषावर पुणे महापालिकेने यश मिळवले आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख शहर असलेल्या पुण्यामध्ये ई-गव्हर्नन्सची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. पुणेकर नागरिकांना विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जातात. नागरिकांसाठी महापालिकेच्या बहुसंख्य सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यासाठी महानगरपालिकेचे संकेतस्थळ आणि अॅप वेळोवेळी अद्ययावत केले जाते. यामुळे नागरिकांचा प्रवास, वेळ, पैसा इत्यादी बाबी वाचतात.

स्पर्धेमध्ये पुणे महापालिकेने उपलब्धता निकषावर २१ पैकी १५, सेवा निकषावर ४७ पैकी ४१, तर पारदर्शकता निकषावर ३३ पैकी २७ गुण प्राप्त केले आहेत. संकेतस्थळ कार्यक्षमता निकषावर पुणे महापालिकेने ५३ पैकी ५० गुण मिळवले आहेत. मोबाइल अॅप या निकषावर पुणे महापालिकेने ४५ पैकी ३० तर समाज माध्यम निकषावर ३ पैकी ३ गुण मिळवले आहेत. पुणे महापालिकेच्या या यशाविषयी सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.