Mahametro Employees | मेट्रोचे कर्मचारी हक्कापासून वंचित | आंदोलनाचा  कामगार नेते सुनील शिंदे यांचा इशारा

Homeadministrative

Mahametro Employees | मेट्रोचे कर्मचारी हक्कापासून वंचित | आंदोलनाचा कामगार नेते सुनील शिंदे यांचा इशारा

Ganesh Kumar Mule Jan 22, 2025 4:37 PM

Pune Metro | New Year 2024 | नवीन वर्षाच्या निमित्ताने पुणेकरांना पुणे मेट्रोची भेट 
Pune Metro | पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते रेंजहील स्थानक या उन्नत मार्गिकेवरील शेवटच्या सेगमेंटची उभारणी
Shivajinagar ST Station Pune | शिवाजीनगर एसटी स्थानक १५ दिवसांत पूर्ववत जागी आणा अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू | माजी आमदार मोहन जोशी

Mahametro Employees | मेट्रोचे कर्मचारी हक्कापासून वंचित | आंदोलनाचा  कामगार नेते सुनील शिंदे यांचा इशारा

 

Pune Metro – (The Karbhari News Service) – मेट्रो कामगार (Mahametro Employees) यांच्या विविध प्रश्नाचं निवेदन महामेट्रोला देऊनही अद्यापही या प्रश्नाबाबत मेट्रो प्रशासनाकडून बैठक करण्यात आली नाही. यामुळे तीव्र नाराजी कामगारांमध्ये पसरली आहे. जर प्रशासनाने बैठक करण्यास विलंब केला, तर कर्मचारी महमेट्रो ऑफिसबाहेर आंदोलन करतील असा इशारा कामगार नेते व संघटनेचे अध्यक्ष सुनील शिंदे (Sunil Shinde) यांनी दिला. (Pune News)

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्वाचा घटक म्हणजे महामेट्रो. वनाज ते रामवाडी व स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अशा दोन मार्गावर सुरु झालेली मेट्रोचा आता विस्तार हा कात्रज ते भक्ती शक्ती पर्यंत होत आहे. या पुणे शहरातील अनेक युवक, विद्यार्थी, व्यावसायिक इत्यादींना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी महामेट्रोच्या सर्व कंत्राटी कामगार रात्र दिवस राबत आहे. प्रवाशांचा आरामदायी आणि सोयीस्कर प्रवास होण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे कंत्राटी कामगार जबाबदारी पार पाडत आहे. पण या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अतिशय मजबूत कणा बनवणारे महामेट्रोचे सर्व कंत्राटी कर्मचारी या वाढत्या विस्तारासोबत दुर्लक्षित राहत आहे सातत्याने महामेट्रोच्या कंत्राटी कामगारांचे प्रश्न वाढत चालले आहेत.
कायद्यानुसार किमान वेतनाप्रमाने वेतन व बोनस- सुट्ट्या रजा मिळत नाही, चूक नसतानाही होणारी पगार कपात, सन्मानाची न मिळणारी वागणूक, युनिफॉर्म न भेटणे, हक्कच असूनही न मिळणार कर्मचारी राज्य विमा महामंडळाची आरोग्यसेवा असे विविध प्रश्न
बाबत महामेट्रोचे कंत्राटी कामगार खुलेपणाने बोलले.
निमित्त होत महामेट्रोच्या सर्व कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांनाबाबत राष्ट्रीय मजदूर संघ (RMS) आयोजित बैठकीत.

या बैठकीत सर्व कंत्राटी कामगारांना महामेट्रोने कायम करावे असा ठरावही बैठकीत करण्यात आला.

महामेट्रोमुळे पुणे शहराला स्मार्ट शहरची ओळख निर्माण झाली पण त्याची किंमत चुकवणाऱ्या बहुसंख्य महामेट्रोच्या कंत्राटी कामगारांच्या पदरी मात्र निराशाच येत आहे.

या बैठकीत महामेट्रोचे चालक, सुरक्षारक्षक, साफसफाई कामगार, तिकीट ऑपरेटर सहभागी झाले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0