Pune Municipal Corporation (PMC) – कोविड काळात  पुणे महापालिकेला  दिलेली ७ कोटी रुपयांची देणगी विना वापर पडून!

Homeadministrative

Pune Municipal Corporation (PMC) – कोविड काळात  पुणे महापालिकेला  दिलेली ७ कोटी रुपयांची देणगी विना वापर पडून!

Ganesh Kumar Mule Jan 06, 2025 8:12 PM

PMRDA | ‘पीएमआरडीए’च्या घरकुल योजनेसाठी अर्जाची मुदत वाढवली | १८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची संधी
PMRDA Ward Office | नागरिकांच्या समस्या निराकरणासाठी पीएमआरडीएची तालुकानिहाय ९ क्षेत्रीय कार्यालये सुरु!
Pending First Installment | गौरी गणपती येण्या अगोदर मनपा कर्मचाऱ्यांना पहिल्या हफ्त्याची रक्कम मिळणार का?

Pune Municipal Corporation (PMC) – कोविड काळात  पुणे महापालिकेला  दिलेली ७ कोटी रुपयांची देणगी विना वापर पडून!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – कोविड जागतिक महामारीच्या (Covid) पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने मार्च २०२० मध्ये कोविड संकटाचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांना व कंपन्यांना महापालिकेला (PMC Pune) देणगी देण्यासाठी आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत अनेक नागरिक व कंपन्यांनी पुणे महापालिकेला (PUne Municipal Corporation – PMC)  २०२०-२१ मध्ये ४.८९ कोटी तर २०२१-२२ मध्ये ३.१० कोटी एवढ्या रकमेच्या देणग्या दिल्या. मात्र महापालिकेने २०२०-२१ मध्ये यातील एकही पैसा खर्च केला नाही तर २०२१-२२ मध्ये १.३० कोटी रुपये करोना बेड व ऑक्सिजन वर खर्च केले. आजवर यातील शिल्लक रकमेवर ७० लाख रुपये व्याज महापालिकेला मिळाले आहे व आज रोजी या कोविड सीएसआर खात्यात ७.४३ कोटी रुपये पडून आहेत. माहिती अधिकारच्या माध्यमातून सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी ही माहिती प्रकाशात आणली आहे.  (Pune News)

वेलणकर यांनी सांगितले कि, करोना काळात नागरीकांचे झालेले प्रचंड हाल बघता देणगी म्हणून आलेले कोट्यावधी रुपये खर्च न करू शकण्याचा करंटेपणा करणार्या पुणे महापालिकेचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. यापुढे एखादी आपत्ती आली तर नागरिक महापालिकेला मदत करायला पुढे येतील का असा विचारही आपल्या व आपल्या अधिकार्यांच्या मनात आला नाही याचे वैषम्य वाटते. प्रशासन प्रमुख म्हणून यामध्ये आपली जबाबदारी मोठी आहे. जुलै २०२३ मध्ये माहिती अधिकारात मी यासंबंधीची माहिती मिळवून उघडकीस आणली होती , अपेक्षा अशी होती की तातडीने यावर काही तरी निर्णय होईल.

आजच्या सोमवारच्या माहिती अधिकार दिनात पुन्हा एकदा माहिती घेतली असता हे स्पष्ट झाले की गेल्या दीड वर्षातही या रकमेतील एकही रुपया महापालिका खर्च करु शकलेली नाही. ही बाब अत्यंत उद्वेगजनक आहे. असेही वेलणकर म्हणाले.

———

या साडेसात कोटी रुपयांच्या निधीतून पुणे महापालिका इस्पितळे आणि दवाखाने यामध्ये आवश्यक ती यंत्रसामुग्री घेऊन गरजू पुणेकर रुग्णांची सोय करावी अशी आमची मागणी आहे

—— विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच पुणे

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0