PMC Employees DA Hike | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना सुधारित दराने महागाई भत्ता लागू | मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी जारी केले सर्क्युलर!

Homeadministrative

PMC Employees DA Hike | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना सुधारित दराने महागाई भत्ता लागू | मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी जारी केले सर्क्युलर!

Ganesh Kumar Mule Dec 20, 2024 8:53 PM

DA Hike News | प्रतीक्षा संपली | केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळाली मोठी बातमी | मंत्रिमंडळाने मंजूर केला महागाई भत्ता
HRA Hike Latest News | Another gift to central employees after DA increase | HRA increased by 3 percent
 Implement Revised Dearness Allowance to PMC Employees on Central government Employees 

PMC Employees DA Hike | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना सुधारित दराने महागाई भत्ता लागू | मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी जारी केले सर्क्युलर!

 

PMC Employees DA Hike – (The Karbhari News Service) केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) ३ टक्के वाढ मंजूर केली आहे. जुलै २०२४ पासून कर्मचाऱ्यांना ५३ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. याच धर्तीवर पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना (PMC Employees and Officers) सुधारित दराने महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे. यात एकूण ५ महिन्यांचा म्हणजे जुलै ते नोव्हेंबर चा फरक डिसेंबर २०२४ पेड इन जानेवारी २०२५ च्या वेतनात दिला जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांनी जारी केले आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

पुणे मनपा अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाप्रमाणे महागाई भत्ता देण्याबाबत पुणे मनपा व कामगार संघटना यांचेमध्ये करार झालेला असून केंद्राप्रमाणे महागाई भत्ता देण्याचे धोरण व प्रचलित कार्यपध्दती आहे.

पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी/कर्मचारी यांना महागाई भत्त्याच्या दरामध्ये सुधारणा करून जुलै पासून ५० टक्के वरून ५३ टक्के दराने करण्यात आला आहे.

याबाबत जारी केलेल्या परिपत्रकानुसार महापालिका कर्मचाऱ्यांना जुलै २०२४ पासून ५३% महागाई भत्ता दिला जाणार आहे. यात एकूण ५ महिन्यांचा फरक डिसेंबर पेड इन जानेवारी च्या वेतनात दिला जाणार आहे. तसेच सेवानिवृत्त सेवकांना देखील ५३% महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे. सेवानिवृत्त सेवकांना जुलै ते डिसेंबर अशा ७ महिन्याचा फरक जानेवारी पेड इन फेब्रुवारी च्या वेतनात अदा केला जाणार आहे. यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी जारी केलेले सर्क्युलर येथे पहा

Circular_D.A_20.12.24_0

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0