PMC IT Department | माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या उपायुक्त यांनी महापालिकेतील विविध विभागावर दर्शवली नाराजी

Homeadministrative

PMC IT Department | माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या उपायुक्त यांनी महापालिकेतील विविध विभागावर दर्शवली नाराजी

Ganesh Kumar Mule Dec 17, 2024 9:19 PM

Pune Divisional Commissioner | पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडून स्थानिक सुट्ट्या जाहीर
PMC Traffic Planning Department | पुणे महापालिकेचा स्वतंत्र वाहतूक विभाग | महापालिका आयुक्तांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची केली नियुक्ती 
PMC Employees Union | पीएमसी एम्प्लॉईज युनियनने  उत्साहात साजरा केला 66 वा वर्धापन दिन 

PMC IT Department | माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या उपायुक्त यांनी महापालिकेतील विविध विभागावर दर्शवली नाराजी

 

PMC e-Office – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या शासकीय कामकाजात संगणकाचा वापर करून शासकीय कामकाज गतिमान व्हावे, कामकाजात सुसूत्रता यावी, दस्तऐवज सुरक्षित व माहिती त्वरेने प्राप्त होऊन त्याचा निपटारा होणेकरिता सर्व शासकीय विभागामध्ये ई-ऑफीस प्रणालीचा प्रभावीपणे वापर करण्याचे शासन निर्णयान्वये आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. मात्र यावर अंमल करण्यात काही विभाग उदासीनता दाखवत आहेत. याबाबत माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे उपायुक्त यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Pune Municipal Corporation Servants – PMC)

ई-ऑफिस प्रणाली अंमलबजावणी करणेकरिता माहिती व तंत्रज्ञान विभागाद्वारे सर्व विभागांकडील आय.टी. नोडल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ई-ऑफिस प्रशिक्षण वेळोवेळी आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणामध्ये ई-ऑफिस संगणक प्रणालीची वैशिष्ट्ये व e-filing कार्यप्रणालीबद्दल प्रशिक्षण देण्यात आले होते. सर्व आय. टी. नोडल अधिकाऱ्यांना त्यांच्या संबंधित विभागांमध्ये ई-ऑफिस संगणक प्रणाली राबविण्याकरिता आवश्यक ती जबाबदारी देण्यात आलेली होती. तसेच नोडल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संबंधित विभागांची माहिती घेऊन कर्मचाऱ्यांचे ई-ऑफिस युझर आयडी तयार करण्यात आले होते व हे युझर आयडी संबंधित विभागांना देण्यात आले होते. ई-ऑफिस प्रणालीची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींचे निरसन माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील मास्टर ट्रेनर्सच्या मदतीने करण्यात आले होते. परंतु अद्यापही विविध विभागांमध्ये ई-ऑफिस संगणकप्रणाली वर अपेक्षितरित्या कार्यवाही झालेली दिसून येत नाही.

त्यानुसार अतिरिक्त आयुक्त (ज), पुणे महानगरपालिका यांच्या आदेशान्वये ई-ऑफिस संगणक प्रणालीची अंमलबजावणी प्रभावीपणे व तातडीने करावी. सदर प्रणालीची अंमलबजावणी करण्यामध्ये येणाऱ्या अडचणी अथवा मर्यादांचे निराकरण माहिती व तंत्रज्ञान विभागातील मास्टर ट्रेनर्स द्वारे करण्यात येईल. तदनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करावी. असे आदेश उपायुक्त यांनी सर्व विभागांना दिले आहेत.