Pune Pustak Mahotsav | पुणे पुस्तक महोत्सवात दुसरा विश्वविक्रम झाला| एकाच लेखकाच्या अधिकाधिक पुस्तकांचे प्रदर्शन’ यावर विश्वविक्रम
Pune Book Festival – (The Karbhari News Service) – पुणे पुस्तक महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ‘एकाच लेखकाच्या अधिकाधिक पुस्तकांचे प्रदर्शन’ या विष्याववर विश्वविक्रम झाला आहे. परमपूज्य जैन आचार्य विजयरत्न सुंदर सूरिश्र्वर महाराज यांनी ४८१ पुस्तके लिहिली आहे. ही सर्व पुस्तके प्रसिद्ध आहे. या पुस्तकांच्या सहाय्याने हा विश्वविक्रम करण्यात आला.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारपासून पुणे पुस्तक महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या महोत्सवात एकूण पाच विश्वविक्रम करण्यात येणार आहे. यातीलच दुसरा विश्वविक्रम आज शनिवारी करण्यात आला, अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले.
पुणे पुस्तक महोत्सवात प्रसिद्ध लेखक आणि परमपूज्य जैन आचार्य विजयरत्न सुरीश्र्वर महाराज यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या सहाय्याने गिनेज बुक वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला आहे. पुस्तक महोत्सवाच्या तीन ‘ एकाच लेखकाच्या अधिकाधिक पुस्तकांचे प्रदर्शन ‘ अशा विषयाला अनुसरून हा विश्वविक्रम होणार आहे. हा विश्वविक्रम दुपारी बारा वाजता करण्याला सुरुवात होईल. साधारण चार वाजताच्या सुमारास आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत पूर्ण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिद्धार्थ जैन यांनी गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र स्वीकारले. पुणे पुस्तक महोत्सवातील हा दुसरा विश्वविक्रम होता. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी विश्वविक्रम झाल्याने, उपस्थितांनी आनंद व्यक्त केला.गिनेस बुक वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रशासनाने यंदा चार नवीन श्रेण्या खास पुणे पुस्तक महोत्सवासाठी तयार केल्या आहेत. त्यामुळे अधिकाधिक पुणेकरांनी उपस्थित राहून विश्वविक्रमाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन राजेश पांडे यांनी केले आहे.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने लहान मुलांसाठी निर्मिती केलेल्या ‘ माय डे इन पुणे फेस्टिवल ‘ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विशाल चोरडिया लिखित ‘ विशालयात्रा ‘ हे पुस्तक देवेंद्र फडणवीस यांना भेट देण्यात आले.
COMMENTS