Aba Bagul | परकीय शक्तींची घुसखोरी ‘सिटीझन कार्ड’द्वारे रोखणे सहजशक्य : आबा बागुल
Citizen Card – (The Karbhari News Service) – नुकतेच म्यानमारमधील दोन रोहिंग्यांचे वास्तव पुण्यात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे त्यातील एकाने चक्क घरही बांधल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी देशात पुणेच काय सर्वच शहरांमध्ये परकीय शक्तींची होणारी घुसखोरी ही देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घातक आहे. मात्र ती ‘सिटीझन कार्ड’ द्वारे रोखणे सहजशक्य आहे. हे सिटीझन कार्ड केवळ परकीय शक्तींवर नजर ठेवण्यापुरते मर्यादित असणार नाही तर लोकसंसंख्येची घनता , नागरिकांचे स्थलांतर , पायाभूत सुविधांवरील ताण यासह कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वरदान ठरणार आहे. महाराष्ट्रापासून देशात हे ‘सिटीझन कार्ड’ निश्चितच पथदर्शी ठरेल. त्यामुळे ‘सिटीझन कार्ड’विषयीच्या सविस्तर सादरीकरणासाठी वेळ द्यावा आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. अशी मागणी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री व सर्व पक्ष नेत्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
याबाबत आबा बागुल यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री ,सर्व पक्ष नेते तसेच राज्याचे पोलीस महासंचालक,पुणे पोलिस आयुक्त, पुणे महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रत्येक शहराच्या शाश्वत विकासासाठी काळानुसार बदलायचे असते ,त्यासाठीच सिटीझन कार्ड ही अभिनव योजना जी पुण्यासाठीच काय देशासाठी नक्कीच पथदर्शी ठरणार आहे.आज पुण्यात वास्तव्यास असणारे आणि शिक्षण , नोकरी, पर्यटन, स्थलांतरित , वैद्यकीय उपचार या निमित्ताने पुण्यात येणाऱ्यांचे प्रमाण पाहता त्याची नक्की किती आकडेवारी आहे हा प्रश्न जितका महत्वाचा आहे, त्याहीपेक्षा या सर्वांमुळे पुण्याच्या पायाभूत सुविधेवर पडणारा ताण हा मुद्दा दुर्लक्ष करून चालणार नाही. वाढत्या नागरीकरणामुळे पायाभूत सुविधा तोकड्या पडतात पण मूळ पुणेकर पर्यायाने करदात्या नागरिकांवर त्याचा भार पडतो. शिवाय वाढती गुन्हेगारी यासह अन्य निर्माण होणारे प्रश्न हे वेगळेच.अशीच परिस्थिती प्रत्येक शहरांची आहे. त्यात आता परकीय शक्तींची घुसखोरी होत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे ती घुसखोरी रोखण्यासाठी हे सिटीझन कार्ड वरदान ठरणार आहे. देशातील नागरिक कुठल्याही शहरात कोणत्याही कारणांसाठी जाऊ शकतो. मात्र ती व्यक्ती कुठे ,कशासाठी आली याची माहिती व्हावी यासाठी सिटीझन कार्ड त्या- त्या शहरात देणे अशी व्यवस्था असणे आवश्यक आहे. आपण परदेशात जाताना ज्या ज्या प्रक्रियेतून जातो. ती त्या त्या देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाची असते. आपल्याकडून तेथील पायाभूत सुविधांच्या वापरापोटी जसे कि पाणी वापर, स्वच्छता आदींचा कर आपल्याकडून ते वळते करून घेत असतात. शिवाय त्या त्या देशांना आपल्यामुळे एकप्रकारे उत्पन्न मिळते म्हणजेच एकप्रकारे महसूल त्या देशाला मिळतो आणि बाहेरील व्यक्तींच्या येण्याने पायाभूत सुविधांवर पडणारा भार तेथील नागरिकांवर पडत नाही. याच धर्तीवर हे सिटिज़न कार्ड प्रत्येक शहरासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.
सिटीझन कार्ड म्हणजे नेमके काय ?
*जन्मापासून ते मृत्यूपर्यंतची इत्यंभूत माहिती.
* आरोग्यापासून शिक्षणापर्यंत इतकंच काय कुटुंबांची संपूर्ण माहिती.
*रहिवासासह आवश्यक ते सर्व कागदपत्रे (रेशनकार्ड, इलेक्शन कार्ड, आधार कार्ड, वाहन परवाना, पारपत्र, फोटो ) सिटीझन कार्डमध्ये एकत्रित करण्याची योजना.
*सरकारी ,निमसरकारी अथवा शाळा, महाविद्यालय अशा कोणत्याही कामांसाठी आवश्यक कागदपत्रे नेण्याची गरज नाही.
*केवळ एका ‘ क्लिक ‘ वर सर्व कामकाज असे स्वरूप.
* आधार कार्डच्या धर्तीवर सिटीझन कार्ड, ज्यात आधार कार्डचाच क्रमांक असणार.
* केंद्र सरकारच्या योजनांसाठीही ग्राहय आणि लाभार्थीसाठीही पात्र.
*दरवर्षी आपोपाप नूतनीकरण होणार.
*शिक्षण , नोकरी, पर्यटन, स्थलांतरित , वैद्यकीय उपचार या निमित्ताने कोणत्याही शहरात येणाऱ्यांनाही अस्थायी स्वरूपाचे सिटिज़न कार्ड.
COMMENTS