PMC Pune Book Festival | पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत उद्या दुपारी १२ ते १ या वेळेत ‘शांतता…पुणेकर वाचत आहेत’ उपक्रमाचे आयोजन | महापालिका कर्मचाऱ्यांना देखील आयुक्तांचे आदेश 

Homeadministrative

PMC Pune Book Festival | पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत उद्या दुपारी १२ ते १ या वेळेत ‘शांतता…पुणेकर वाचत आहेत’ उपक्रमाचे आयोजन | महापालिका कर्मचाऱ्यांना देखील आयुक्तांचे आदेश 

Ganesh Kumar Mule Dec 10, 2024 8:49 PM

Pune News | स्वारगेट परिसरातील केबल दुर्घटना प्रकरणी तातडीने कारवाई व केबल ऑडिट करा | भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांची मागणी
PMC Deputy Commissioner | अखेर उपयुक्तांना वाटून दिले विभाग | चेतना केरूरे यांच्याकडे परिमंडळ ५, आशा राऊत यांना परिमंडळ ३ तर माधव जगताप यांच्याकडे फक्त मिळकतकर विभागाची जबाबदारी 
Kiosk Facility in PMC | पुणे महापालिकेच्या अभ्यागत कक्षात किओस्कची सुविधा! 

PMC Pune Book Festival | पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत उद्या दुपारी १२ ते १ या वेळेत ‘शांतता…पुणेकर वाचत आहेत’ उपक्रमाचे आयोजन | महापालिका कर्मचाऱ्यांना देखील आयुक्तांचे आदेश

 

Pune Book Festival – (The Karbhari News Service) – साहित्य-संस्कृती, कलांवर प्रेम करणारे पुणेकर (११ डिसेंबर) एक तास वाचनासाठी देणार आहेत. पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत ‘शांतता…पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम  शहरभरात राबवला जाणार असून, दुपारी १२ ते १ या कालावधीत आपल्याला आवडीचे किंवा जवळ असलेले कोणतेही पुस्तक वाचन करतानाचे छायाचित्र काढून ते pbf24.in/register या लिंकवर पाठवायचे आहे. (Pune Pustak Mahotsav)

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. यंदा अधिक भव्य स्वरुपात महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. या अनुषंगाने वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी, नव्या पिढीला वाचनाची गोडी लावण्यासाठी वाचनाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आज (११ डिसेंबर) ‘शांतता…पुणेकर वाचत आहेत’ हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. शहरातील शाळा, उच्च शिक्षण संस्था, ग्रंथालये, शासकीय कार्यालये, पुणे विमानतळ, मेट्रो स्टेशन्स अशा विविध ठिकाणी एक तास वाचनासाठी दिला जाणार आहे.

शहरात ठिकठिकाणी वाचन करतानाच ऐतिहासिक महत्त्व असलेल्या अप्पा बळवंत चौकातही ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम होणार आहे. त्यात पुस्तक विक्रेते, वर्तमानपत्र विक्रेते, विद्यार्थ्यांसह साहित्यिक, विविध क्षेत्रातील मान्यवरही सहभागी होणार आहेत. या उपक्रमासाठी अप्पा बळवंत चौकाचे सुशोभीकरण करून वाचकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी वाचन व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे महापालिकेकडून बुधवारी लक्ष्मी रस्त्यावर पादचारी दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पायी फिरणाऱ्या पुणेकरांनी काही वेळ वाचनासाठी द्यावा या उद्देशाने लक्ष्मी रस्त्यावरील दुकानांमध्ये पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार असल्याने मनसोक्त खरेदी करतानाच वाचनानंदही घेता येणार आहे.


महापालिका आयुक्तांचे काय आहेत आदेश!

दरम्यान या उपक्रमात पुणे महापालिका देखील सहभागी आहे. त्यामुळे या उपक्रमाबाबत महापालिका आयुक्त दो राजेंद्र भोसले यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिका कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सहभागी होत आपले पुस्तक घेऊन यायचे आहे. तसेच दुपारी १२ ते १ या कालावधीत जुना जी बी हॉल येथे पुस्तकाचे वाचन करायचे आहे.