PMC Deep Clean Drive | महापालिकेच्या घनकचरा आणि इतर विभागाच्या माध्यमातून शहरात डिप क्लीन ड्राईव्ह!
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या वतीने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरात विविध झोन नुसार स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. आज झोन एक मध्ये डिप क्लीन ड्राईव्ह राबवण्यात आला. आगामी काळात सर्व झोन मध्ये अशाच पद्धतीने ड्राईव्ह घेण्यात येणार आहेत. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम यांनी दिली. (Pune Municipal Corporation Solid Waste Management Department)
उपायुक्त कदम यांच्या माहितीनुसार अलंकार चौक ते पोलीस आयुक्तालय चौक ते नेहरू मेमोरियल रस्ता दोन्ही बाजू २ – नेहरू मेमोरियल रस्ता ते मालधक्का चौक दोन्ही बाजू ३ – बंडगार्डन पाणीपुरवठा चौक ते जहांगीर हॉस्पिटल चौक रस्ता दोन्ही बाजू ४ – जहांगीर हॉस्पिटल चौक ते RTO संगमब्रीज दोन्ही बाजू ५ – रुबी हॉल हॉस्पिटल ते सिटी पॉईंट चौक दोन्ही बाजू या मार्गावर डीप क्लीन ड्राईव्ह घेण्यात आला.
यात घनकचरा विभाग, विद्युत विभाग, स्थापत्य, अतिक्रमण विभाग, आकाशचिन्ह आणि वृक्ष विभागाच्या वतीने सहभागी घेत विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली.
घनकचरा विभागने केलेली कारवाई
प्रभाग २०
| राडारोडा – ६ मे. टन
ओला कचरा ५ मे. टन, सुका कचरा – २ मे.टन
गार्डन वेस्ट – २.५ मे. टन
प्रभाग क्र. २१
राडारोडा – १० मे. टन
| ओला कचरा- ७ मे. टन, सुका कचरा – ५ मे. टन
गार्डन वेस्ट – २.५ मे. टन
सहभागी कर्मचारी संख्या
२९१
३५०
एकूण ६४१
स्थापत्य (विद्युत)
एकूण नेट केबल १५८० मीटर कट करण्यात आले
१०
स्ट्रीट लाईट पोल ३० ठिकाणी झाकण बदलले.
स्थापत्य – अलंकार चौक ते मालधक्का चौक ड्रेनेज चेंबर साफसफाई- १९
प्रभाग २०
रस्ते डागडुजी – ६० SQ.MTR
फुटपाथ दुरुस्ती – २५ SQ.MTR
पावसाळी चेंबर पूर्ण बांधकाम व १ चेंबर उचलले
प्रभाग – २१
रस्ते डागडुजी – ७० SQ.MTR
अतिक्रमन विभाग
हातगाडी – ०३
स्टॉल- ०३
लोखंडी काउंटर ०३
नादुरुस्त वाहन (चारचाकी) – ०१
| नादुरुस्त वाहन दुचाकी – ०२
पथारी – ०२
इतर- ४४
आकाश चिन्ह विभाग बोर्ड / बॅनर – ३५
वृक्ष विभाग
स्टीकर / पोस्टर – १२३
अलंकार चौक ते पोलीस आयुक्तालय दोन्ही बाजू – २० झाडे
| बंडगार्डन पाणीपुरवठा ते RTO ऑफिस पुणे दोन्ही बाजू-
– ४२ झाडे
धोकादायक फांद्यांची छाटणी व रस्ते साफसफाई करण्यात आले.
—-
डिप क्लिन ड्राईव च्या माध्यमातून पुणे शहर स्वच्छ ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यात सगळेच विभाग योगदान देत आहेत. सर्व झोन मध्ये हे काम केले जाणार आहे. यात अडगळीच्या सामानापासून ते बेवारस वाहने, झाडाच्या फांद्या काढण्यापर्यंत कामे केली जात आहेत.
– संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा विभाग.
COMMENTS