Pune Property tax | सिंहगड टेक्नीकल इन्स्टिट्यूटवर मिळकतकर विभागाची जप्तीची कारवाई | ४७ कोटींची थकबाकी

Homeadministrative

Pune Property tax | सिंहगड टेक्नीकल इन्स्टिट्यूटवर मिळकतकर विभागाची जप्तीची कारवाई | ४७ कोटींची थकबाकी

Ganesh Kumar Mule Dec 06, 2024 9:32 PM

Pune Property Tax | सामन्य  पुणेकर  करदात्याच्या सहनशीलतेचा अंत कधी संपणार?
Pune PMC Property Tax | अभय योजना आणण्याचा विचार करू नका | सामाजिक संस्था आणि माजी नगरसेवकांची मागणी 
Pune Property Tax | मिळकत कर वसुलीसाठी दामिनी महिलांची 12 पथके | कर वसुलीसाठी पहिल्यांदाच महिलांना जबाबदारी 

Pune Property tax | सिंहगड टेक्नीकल इन्स्टिट्यूटवर मिळकतकर विभागाची जप्तीची कारवाई | ४७ कोटींची थकबाकी

 

PMC Property tax Department – (The Karbhari News Service) – कर आकारणी व कर संकलन खात्याने सन २०२४-२५ चे उद्दिष्ट पूर्ततेच्या अनुषंगाने थकवाकी वसुली मध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष्य केंद्रित केलेले आहे. त्या अनुषंगाने २ डिसेंबर पासून मिळकत कर वसुलीसाठी बँड पथकाचा समावेश असलेले स्वतंत्र वसुली पथके तयार करण्यात आलेली आहेत. (Pune Municipal Corporation property tax Department)

या पथकामार्फत १५ क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील थकबाकी असलेल्या मिळकतीवर थकबाकी वसुलीची कारवाई हाती घेण्यात आलेली आहे. त्यानुसार २ डिसेंबर ते ६ डिसेंबर या पाच दिवसांच्या काळामध्ये बँड पथकाद्वारे व मध्यवर्ती पथकाद्वारे १६५ इतक्या मिळकतींना भेट देण्यात येवून, १४,१४,२६,२१२/- (चौदा कोटी चौदा लाख सव्हीस हजार दोनशे बारा रुपये फक्त) इतक्या रकमेचा कर
वसुल करण्यात आलेला आहे. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.

तसेच सिंहगड टेक्नीकल इन्स्टिट्यूट यांची कोंढवा बु., आंबेगाव बु., एरंडवणे येथे मिळकत असून एरंडवणे येथील मिळकतीवर थकबाकी ४७,४३,१८,३०३/- ( सत्तेचाळीस कोटी त्रेचाळीस लाख अठरा हजार तीनशे तीन रुपये फक्त) एवढी असल्याने मिळकतीवर जप्तीची कारवाई करण्यात आली.

०६ डिसेंबर रोजी एकूण २६ इतक्या मिळकती जप्त करण्यात आलेल्या आहेत.

पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुमारे १४ लाख ८० हजार मिळकती असून, त्यापैकी सुमारे ८,७४,५४६ मिळकत धारकांनी त्यांचा मिळकत कर रक्कम रु. १८०४ कोटी इतका जमा केलेला आहे. उर्वरित मिळकत कर थकबाकी धारकांकडे या पुढील कालावधी मध्ये मोठ्या प्रमाणात थकबाकी वसुली करण्यासाठी पथकांमार्फत मिळकत कर वसुलीचे काम करण्यात येत आहे. तरी ज्या मिळकत धारकांनी अद्यापही भरणा केलेला नाही, त्यांचेवर कारवाई केली जाणार आहे. असेही जगताप यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0