Maharashtra Vidhansabha Election | पुणे महानगरपालिका क्षेत्रात दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींकरीता समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती

Homeadministrative

Maharashtra Vidhansabha Election | पुणे महानगरपालिका क्षेत्रात दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींकरीता समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती

Ganesh Kumar Mule Nov 17, 2024 9:21 PM

Dr Suhas Diwase | निवडणूक कामकाजाचे चित्रीकरण करुन प्रसारित केल्यास कठोर कारवाई- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Pune Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी ११ हजार ८९८ मतदान यंत्रांची सरमिसळ
Pune Loksabha Election | पुणे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र सज्ज

Maharashtra Vidhansabha Election | पुणे महानगरपालिका क्षेत्रात दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींकरीता समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती

Pune Municipal Corporation Limits- (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका क्षेत्रातील एकाच इमारतीतील एकूण मतदान केंद्रांमध्ये १० हजारापेक्षा अधिक मतदार असलेल्या ठिकाणी विविध सुविधेबाबत समन्वय साधण्याकरीता मतदान केंद्रनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. (Pune News)

पुरंदर, वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, हडपसर, पुणे कॅन्टोमेंट आणि कसबापेठ या विधानसभा मतदारसंघाअंतर्गत पुणे महानगर पालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांच्याठिकाणी विविध सुविधांबाबतचे दिशादर्शक फलक, पिण्याचे पाणी, स्वच्छता, गर्दीचे नियोजन आदी बाबींमध्ये समन्वय साधण्याकरीता पुणे महानगरपालिकेच्या समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. दिवसे यांनी दिली आहे.
0000

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0