Pune PMC Encroachment Action | वारजे येथील मुंबई बेंगलोर हायवे येथे फळ विक्रेत्यांवर धडक कारवाई

Homeadministrative

Pune PMC Encroachment Action | वारजे येथील मुंबई बेंगलोर हायवे येथे फळ विक्रेत्यांवर धडक कारवाई

Ganesh Kumar Mule Nov 08, 2024 7:28 PM

Pune Municipal Corporation Fort Competition | पुणे महापालिकेची किल्ले स्पर्धा आजपासून | सर्वोत्कृष्ट किल्ल्यास ७००१ चे बक्षीस 
 Pune Potholes | रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरीत बुजवा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल | शहर अध्यक्ष प्रमोद भानगिरे यांचा इशारा
NCP Pune | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून मालवण च्या घटनेच्या निषेधार्थ मुक निदर्शने

Pune PMC Encroachment Action | वारजे येथील मुंबई बेंगलोर हायवे येथे फळ विक्रेत्यांवर धडक कारवाई

 

PMC Encroachement Department – (The Karbhari News Service) –  आज  वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालया (Warje Ward Office)  मार्फत वारजे येथील मुंबई बेंगलोर हायवे येथे अनधिकृत फळ विक्रेत्यांच्या हातगाड्यावर कारवाई करण्यात आली. (Pune PMC News)

मुंबई बेंगलोर महामार्गावर गेले अनेक दिवस नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रारी मोठ्या प्रमाणात येत होती. परंतु संबंधित व्यवसाय धारक हे खाजगी जागेत असल्याचे भासउन अनधिकृत रित्या महामार्गावर व्यवसाय करीत असल्याचे कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग यांनी निदर्शनास आणून दिल्याने त्या अनुषंगाने संबंधित ठिकाणी कार्यवाही करण्यात आली. (Pune Municipal Corporation (PMC)

साधारण 06 बिगर टप हातगाडी, 1 लोखंडी काउंटर, 14 मोठे टायर, 2 टेंथ, 1 वजन काटा, 6कॅरेट फळ पथारी, 1 गॉगल स्टॅन्ड, 25 टेडी, 20 चादरी, 5 गाद्या व 40 रजया जप्त करण्यात आल्या. व 5 कच्चे शेड पाडून टाकण्यात आले. सदर ठिकाणी व्यावसायिकांनी कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात
विरोध केला पण विरोधाला न जुमानता ही करावाई चालू ठेवली .

नवनियुक्तअतिक्रमण निरीक्षक  अजय गोळे यांनी आज मुख्य रस्त्यांच्या साईड मार्जिन मध्ये असलेल्या अनधिकृत स्टॉल धारकांवर धडक कारवाई चालू केली. सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे अतिक्रमन निरीक्षक आयुब शेख यांनी कारवाई साठी सहकार्य केले.

कारवाई मध्ये 3 ट्रक व 25 बिगारी सेवक यांच्या मार्फत ही कारवाई करण्यात आली.

अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली , महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकल, अतिक्रमन निरीक्षक अजय गोळे, सहाय्यक अतिक्रमन निरीक्षक, श्रीमती किरण डवरी यांनी यशस्वीरित्या कारवाई पार पाडली.

अजय गोळे यांनी अनधिकृत व्यवसाय धारकांना आव्हान केले आहे की, रस्त्याच्या बाजूला असलेल्या सोसायटीच्या साईड मार्जिन मध्ये केलेल्या अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल आपण होऊन काढून घ्या अन्यथा येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार आहे. रस्ता व पदपथावर सुद्धा कोणीही अतिक्रमण करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0