Kothrud Vidhansabha | कोथरुड साठी चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी | कोथरुडमध्ये तिरंगी लढत

HomeBreaking News

Kothrud Vidhansabha | कोथरुड साठी चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी | कोथरुडमध्ये तिरंगी लढत

Ganesh Kumar Mule Oct 27, 2024 3:29 PM

PMC Election 2022 : पुणे महानगरपालिका जिंकण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न उध्वस्त होईल!
BJP : PMC Election : महापालिका निवडणूक मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली लढणार भाजप
Pune Road | रस्ते विकासाचा सर्वंकष आराखडा तयार करा! | पुण्यातील नागरी समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामध्ये बैठक

Kothrud Vidhansabha | कोथरुड साठी चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी | कोथरुडमध्ये तिरंगी लढत

 

Chandrakant Mokate – (The Karbhari News Service) – महाविकास आघाडी कडून कोथरुड विधानसभा मतदारसंघासाठी अजून उमेदवार दिला नव्हता. ही जागा पहिल्यापासून शिवसेना (UBT) ला देण्यात आली आहे. मात्र पक्षाकडून उमेदवारी कुणाला द्यावी, याबाबत संभ्रम होता. अखेर माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Shivsena – UBT)

दरम्यान कोथरुड मधे तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. भाजपकडून कोथरुड साठी चंद्रकांत पाटील यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. तर मनसेने किशोर शिंदे यांच्या रुपात उमेदवार दिला आहे.

दरम्यान शिवसेना (UBT) पक्षाकडून पृथ्वीराज सुतार आणि मोकाटे हे उमेदवारी मागत होते. यावेळी सुतार यांनाच उमेदवारी दिली जाईल, अशी अटकळ बांधण्यात आली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी मोकाटे यांना उमेदवारी दिली आहे. यावेळी पुण्यातून प्रशांत बधे हे देखील उपस्थित होते.

——

आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपली सेवा करण्यासाठी शिवसेना महाविकास आघाडीकडून कोथरूड मतदार संघातून मला अधिकृत उमेदवारी दिली आहे.
आपल्या सर्वांचा विश्वास सार्थकी लावण्यासाठी मी कटीबद्ध राहील असा आपणास विश्वास देतो.

– चंद्रकांत मोकाटे

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0