Vidhansabha Election | भाजपकडून भीमराव तापकीर, सुनिल कांबळे, हेमंत रासने | तर शरद पवार यांच्या पक्षाकडून अश्विनी कदम, सचिन दोडके यांना संधी
Pune News – (The Karbhari News Service) – पुण्यातील मतदारसंघातील लढती आता स्पष्ट झाली आहे. भाजप आणि शरद पवार यांच्या पक्षाने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यामुळे या लढती स्पष्ट झाल्या आहेत.
भाजपकडून आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनिल कांबळे आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना संधी देण्यात आली आहे.
तर शरद पवार यांच्या पक्षाने अश्विनी कदम आणि सचिन दोडके यांना संधी दिली आहे.
खडकवासला मतदार संघात भाजपचे भीमराव तापकीर, शरद पवार पक्षाचे सचिन दोडके आणि मनसेचे मयूरेश वांजळे यांच्यात लढत होणार आहे.
पर्वती मतदारसंघात भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ, शरद पवार पक्षाच्या अश्विनी कदम आणि अपक्ष आबा बागुल यांच्यात लढत होणार आहे.
कसबा पेठ मतदारसंघात काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यात लढाई होणार आहे. मागील पोटनिवडणुकीत धंगेकर यांनी रासने यांचा पराभव केला होता.
पुणे छावणी मतदारसंघासाठी भाजपकडून आमदार सुनील कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान महाविकास आघाडी कडून अजून उमेदवार देण्यात आलेला नाही.
तर याआधी हडपसर साठी शरद पवार पक्षाकडून प्रशांत जगताप, अजित पवार यांच्या पक्षाकडून आमदार चेतन तुपे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वडगावशेरी मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी पक्षात लढाई होणार आहे. आमदार सुनील टिंगरे यांचा सामना माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासोबत होणार आहे. भाजपकडून शिवाजीनगर साठी आमदार सिद्धार्थ शिरोळे, कोथरुड साठी आमदार चंद्रकांत पाटील, पर्वती साठी माधुरी मिसाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान महाविकास आघाडीकडून अजून काही ठिकाणचे उमेदवार घोषित करण्यात आलेले नाहीत.
COMMENTS