Parivartan Mahashakti | ‘परिवर्तन महाशक्ती’ ची वज्रमूठ, युती आघाडीला देणार टक्कर  | आचारसंहिता लागू झाल्यावर नियोजन बैठक, १५० जागांचे वाटप पूर्ण

HomeBreaking News

Parivartan Mahashakti | ‘परिवर्तन महाशक्ती’ ची वज्रमूठ, युती आघाडीला देणार टक्कर | आचारसंहिता लागू झाल्यावर नियोजन बैठक, १५० जागांचे वाटप पूर्ण

Ganesh Kumar Mule Oct 17, 2024 8:47 PM

98th Marathi Sahitya Sammelan | अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे ते दिल्ली यादरम्यान महादजी शिंदे यांच्या नावाने विशेष रेल्वे सेवा 
Stall on ST Bus Stand | आता प्रत्येक बसस्थानकावर महिला बचतगट, दिव्यांग, माजी सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी स्टॉल
Maharashtra Vidhansabha Election Results | ‘मिशन पश्चिम महाराष्ट्र पूर्णत्वास’ : मुरलीधर मोहोळ

Parivartan Mahashakti | ‘परिवर्तन महाशक्ती’ ची वज्रमूठ, युती आघाडीला देणार टक्कर

| आचारसंहिता लागू झाल्यावर नियोजन बैठक, १५० जागांचे वाटप पूर्ण

 

Parivartan Mahashakti – (The Karbhari News Service) – राज्यामध्ये विधानसभा निवडणुक आचारसंहिता लागू झाल्यानंतर ‘परिवर्तन महाशक्ती’ च्या वतीने बैठक स्वराज्य भवन, पुणे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजीराजे, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी, स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, महाराष्ट्र राज्य समितीचे शंकरअण्णा धोंडगे, भारतीय जवान किसान पक्षाचे नारायण अंकुशे व अनेक समविचारी नेते एकत्रित आले होते. (Maharashtra Vidhansabha Election)

या बैठकीदरम्यान १५० जागांवरील वाटप पुर्ण झाले तसेच जाहीरनाम्याविषयी चर्चा झाल्याचे पत्रकार परिषद मधून समजले. लवकरच आचारसंहिता जाहीर केली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.

‘महाविकास आघाडी व महायुती हे वेगवेगळ्या रंगाचे दोन पॅकेज आहेत परंतु आतमध्ये एकच माल आहे.’ अशी टिका राजू शेट्टी यांनी आघाडी व युती वर केली.
‘आमचे सरकार एका झेंड्याचे नसेल तर आमच्या डोक्यात तिरंगा असेल.’ असे प्रतिपादन बच्चू कडू यांनी केले.

‘राजू शेट्टी व बच्चू कडू यांच्याविषयी गैरसमज पसरवणारे अनेक मॅसेज सध्या फिरत आहेत, त्यांना उत्तर म्हणजे आजची बैठक आहे’ असे म्हणत छत्रपती संभाजीराजे यांनी बच्चू कडू व राजू शेट्टी परिवर्तन महाशक्ती सोबतच राहणार असल्याचे सांगितले.

या बैठकीसाठी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, अंकुश कदम, रघुनाथ चित्रे, प्रहार पक्षाचे अनिल चौधरी यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.