Pune PMC Fort Competition | पुणे महापालिकेची किल्ले स्पर्धा २८ ऑक्टोबर पासून | प्रवेशशुल्क अवघे ५ ते १० रुपये

Homeadministrative

Pune PMC Fort Competition | पुणे महापालिकेची किल्ले स्पर्धा २८ ऑक्टोबर पासून | प्रवेशशुल्क अवघे ५ ते १० रुपये

Ganesh Kumar Mule Oct 12, 2024 4:13 PM

Kojagiri Purnima 2024 | PMC Garden Department | कोजागिरी पौर्णिमे निमित्त महापालिकेची उद्याने रात्री 12 पर्यंत उघडी राहणार!
  Be careful if you harm the tree for Holi!  The fine can be up to 1 lakh!  |  Warning of Garden Department of Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporation’s 42nd Fruits, Flowers and Vegetables Exhibition inaugurated by PMC Commissioner Vikram Kumar!

Pune PMC Fort Competition | पुणे महापालिकेची किल्ले स्पर्धा २८ ऑक्टोबर पासून | प्रवेशशुल्क अवघे ५ ते १० रुपये

| जास्तीत नागरिकांनी सहभागी होण्याचे महापालिका उद्यान विभागाचे आवाहन

 

Pune PMC Fort Competition – ( The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरणाच्या (PMC Garden Department) वतीने दिवाळी निमित्ताने किल्ले स्पर्धा आयोजित केली जाते. यंदाच्या वर्षी देखील या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा २८ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. जंगली महाराज रोडवरील छत्रपती संभाजी राजे उद्यानात ही स्पर्धा होणार आहे. किल्ले स्पर्धेत तीन विभाग केले आहेत. यासाठी प्रवेश शुल्क अवघे ५ ते १० रुपये असे आहे. अशी माहिती मुख्य उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे यांनी दिली. (Pune PMC Fort Competition)

वाढत्या शहरीकरणामुळे राहणीमानात झालेल्या बदलांमुळे मुलांना किल्ला करण्यासाठी जागा उपलब्ध नसते. त्यामुळे किल्ले तयार करण्यासाठी जागा मिळावी आणि विद्यार्थ्यांच्या मनात आवड निर्माण व्हावी या उद्देशाने पुणे महापालिके प्रत्येक वर्षी ही स्पर्धा आयोजित करत असून यांदाचे हे ३० वे वर्ष आहे. या स्पर्धेतील किल्ल्यांचे परीक्षण इतिहास व भूगोल तज्ज्ञ यांच्याकडून करण्यात येणार आहे. (Pune PMC Fort Competition)

शालेय विद्यार्थी गटासाठी प्रवेश शुल्क हे ५ रुपये असे आहे. यात पहिलीपासून ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दुसरा गट हा सरकारी, निमसरकारी आणि खाजगी संस्थांचा आहे. यांना १० रुपये प्रवेश शुल्क आहे. तिसरा गट हा सर्वासाठी खुला आहे. यात १६ वर्षावरील सर्व लोक येतात. त्यांना १० रुपये प्रवेशशुल्क आहे.

प्रवेश पत्रिका भरण्याचा कालावधी हा १४ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर असा आहे. प्रवेश पत्रिका ही घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातील वृक्ष प्राधिकरण कार्यालयात भरून द्यायची आहे. स्पर्धकांनी २४ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत किल्ला तयार करायचा आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन २८ ऑक्टोबर दुपारी साडे चार वाजता होणार आहे. यशस्वी स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ सायंकाळी साडे पाच वाजता होणार आहे. उद्घाटन झाल्यांनतर प्रदर्शन हे नागरिकांना पाहण्यासाठी विनामुल्य खुले राहणार आहे, अशी माहिती पालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी दिली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0