Navratri Festival | श्री शनिमारुती बाल गणेश मंडळाच्या वतीने नवदुर्गांचा करण्यात आला सन्मान!

Homecultural

Navratri Festival | श्री शनिमारुती बाल गणेश मंडळाच्या वतीने नवदुर्गांचा करण्यात आला सन्मान!

Ganesh Kumar Mule Oct 12, 2024 2:14 PM

PMRDA Housing | पीएमआरडीएच्या सदन‍िकांची सोडत प्रशासकीय कारणामुळे पुढे ढकलली
Assistant Commissioner | PMC | सहायक आयुक्त पदाच्या नेमणुकीच्या पद्धतीत बदल | वर्ग 3 मधील कर्मचारी देखील परीक्षेद्वारे होणार सहायक आयुक्त
DA Difference | PMPML Pune | PMPML च्या कर्मचाऱ्यांना ५ महिन्याचा महागाई भत्त्याचा फरक मिळणार! 

Navratri Festival | श्री शनिमारुती बाल गणेश मंडळाच्या वतीने नवदुर्गांचा करण्यात आला सन्मान!

 

Pune News | श्री शनिमारुती बाल गणेश मंडळाच्या वतीने नवरात्र महोत्सवानिमित्त नऊ दिवस विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या *नवदुर्गांचा सन्मान सोहळा* करण्याचे योजिले होते. त्यानुसार नुकताच हा सन्मान करण्यात आला.

मंडळाच्या लहान रणरागिनींनी ज्यांनी आपल्या गणेशोत्वाच्या देखाव्यामध्ये काम करून मंडळाला अनेक बक्षीस मिळवून दिले. अशा सर्व लहान रणरागिनी नवदुर्गांचा सन्मान मंडळाच्या वतीने करण्यात आला. यावेळी त्यांनी अत्याचाराविरुद्ध लढण्याची शपथ घेतली ..

आम्ही सर्व जिजाऊच्या,सावित्रीच्या लेकी शपथ घेतो. की समाजात चाललेल्या क्रूर वृत्तीचा महिला वरील होणाऱ्या अत्याचाराचा नाश करण्यासाठी…….आम्ही आमच्या हातात शस्त्र घेऊन त्या नराधम रुपी राक्षसाचा नाश करू आणि तुळजाभवानी आम्हाला यासाठी शक्ती दे……. अशी ती शपथ होती.

कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष सचिनभाऊ पवार यांनी केले. या वेळी सोनू काळे पप्पू हुलगे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.