Aba Bagul Family | प्रत्येकाचा सन्मान हाच एकत्र कुटुंबाचा मूलमंत्र! – आबा बागुल
Bagul Family – (The Karbhari News Service) – एकत्र कुटुंब पद्धतीत प्रत्येक सदस्याचे विचार,आवड – निवड वेगवेगळ्या असतात तरीही त्यांच्यामधील प्रेम व जिव्हाळा जपत सर्वांना बरोबर घेऊन चालणे एक कुटुंब प्रमुख म्हणून तारेवरची कसरत श्री. आबा बागुल व सौ जयश्री आबा बागुल या दांपत्याने यशस्वीरित्या पार पाडली आहे. (Aba Bagul)
मुलांवर संस्कार घडवणे, तरुण पिढीला मार्गदर्शनपर सल्ला देणे, महत्त्वाच्या निर्णयात सर्व सदस्यांना सहभागी करून घेणे,त्यांच्या मतांचा – विचारांचा आदर करणे याच गोष्टींमुळे आज बागुल कुटुंबात तीन पिढ्या एकत्र नांदत आहे. आज त्यांची मुले उच्चशिक्षित आहेत. आर्किटेक्ट,बीबीए, एआय इंजिनिअरिंग, वैद्यकीय आदी विविध शाखेत अव्वल ठरली आहेत.
जनरेशन गॅप आहे आणि असणारच मात्र ती कमी करणे हे आपल्याच हातात आहे हा महत्वपूर्ण संदेश बागुल कुटुंबीयांनी समाजाला दिला आहे. सामाजिक जीवनात सक्रिय योगदान देत आहे.आज हे कुटुंब समाजासाठी दिशादर्शक ठरले आहे.
जनसेवा फाउंडेशनतर्फे आदर्श एकत्र कुटुंब पुरस्कार श्री. आबा बागुल व सौ. जयश्री आबा बागुल यांनी स्वीकारला. यावेळी पी. डी. पाटील, कृष्णकुमार गोयल ,विनोद शहा आदींसह मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS