Pune Helicopter Crash News | पीएमआरडीएच्या बचाव पथकाची हेलिकॉप्टर दुर्घटनास्थळी धाव
Pune Helicopter Crash – (The Karbhari News Service) – बावधन, के के कन्स्ट्रक्शन टेकडी भागात बुधवारी (दि.२) सकाळी साडेआठला अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला हेलिकॉप्टर कोसळल्याची वर्दि नागरिक, शासकीय रुग्णवाहिका १०८ यांच्याकडून मिळाली. यानंतर तातडीने दलाकडून वारजे, औंध, कोथरुड येथील अग्निशमन वाहने, मुख्यालयातून एक रेस्क्यु व्हॅन आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) नांदेड सिटी अग्निशमन दलाकडून एक फायरगाडी एक रेस्क्यु व्हॅन अशा एकुण ४ फायरगाड्या, २ अद्यायवत रेस्क्यु व्हॅन रवाना केल्या होत्या. (Pune Helicopter Accident)
घटनास्थळी पोहोचल्यावर निदर्शनास आले की, हेलिकॉप्टर भस्मसात झाले असून काही प्रमाणात आग लागलेली आहे. त्यामुळे प्रथम हेलिकॉप्टरमध्ये कोणी अडकले नसल्याची खाञी केल्यानंतर तातडीने जवळच काही अंतरावर हेलिकॉप्टरमधील इसम मृत अवस्थेत पडल्याचे दिसले. स्थानिक पोलिस व डॉक्टर यांनी यात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सांगितले. जवानांनी स्ट्रेचरचा वापर करीत मृतदेह जवळपास अर्धा किमी बाहेर आणत पोलिसांच्या ताब्यात देत रुग्णवाहिकेतून रुग्णालयात रवाना केले.
हेलिकॉप्टर हेरिटेज एव्हिऐशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून पुढील तपास पोलिस व इतर संबंधित यंञणा करीत आहेत.
घटनास्थळी पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्यासह अग्निशमन अधिकारी गजानन पाथ्रुडकर, शिवाजी मेमाणे, सुजित पाटील यांच्यासह जवळपास तीस जवान कार्यरत होते. यासह पोलिस विभाग, शासकीय रुग्णवाहिका १०८ पथक, प्रांत अधिकारी, एमआयडीसी हिंजेवाडी अग्निशमन दल आणि मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथकासह आदी विभाग उपस्थित होते.
COMMENTS