PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने नागरिकांना लावली शिस्त | वर्षभरात वसूल केला सव्वा तीन कोटींचा दंड!

Homeadministrative

PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने नागरिकांना लावली शिस्त | वर्षभरात वसूल केला सव्वा तीन कोटींचा दंड!

Ganesh Kumar Mule Sep 27, 2024 7:15 PM

 4 Special Scod Vehicles in fleet of PMC Solid Waste Management Department
PMC Solid Waste Management Bylaws | 500 रुपये दंडाची अंमलबजावणी करण्याचे उपायुक्तांचे आदेश
PMC Solid Waste Management | स्वच्छतेचं दैनंदिन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यामुळेच महापालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार | आयुक्त विक्रम कुमार 

PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने नागरिकांना लावली शिस्त | वर्षभरात वसूल केला सव्वा तीन कोटींचा दंड!

| अस्वच्छता करणाऱ्या ६० हजारहून अधिक नागरिकांवर कारवाई

 

PMC Solid Waste Management Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या (PMC Solid Waste Management Department) वतीने सार्वजनिक जागी थुंकणे, कचरा जाळणे, अस्वच्छता करणे, अशा कारणांसाठी दंडात्मक कारवाई केली जाते. विभागाने ही कारवाई गंभीरपणे सुरु केली आहे. 1 ऑक्टोबर 2023 ते २६ सप्टेंबर २०२४ या काळात सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून सव्वा कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी गेल्या वर्षभरात ६० हजाराहून अधिक पुणेकरांवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम (Deputy Commissioner Sandip Kadam) यांनी दिली. (Pune Municipal Corporation)

| दंड घेण्याची तरतूद

पुणे महापालिकेने सार्वजनिक जागी स्वच्छता राखण्यासाठी स्वच्छता उपविधी तयार केली आहे. त्या नियमानुसार अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांस दंडात्मक कारवाई केली जाते. यामध्ये सार्वजनिक जागी थुंकणे, लघवी करणे, कचरा जाळणे, कचऱ्याचे सुका आणि ओला असे वर्गीकरण न करणे, नदीत राडारोडा टाकणे, अशा गोष्टींचा समावेश आहे. यासाठी 180 रुपयापासून ते 5 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने ही कारवाई सुरु केली आहे. असे कदम यांनी सांगितले. (PMC Pune)

| असा केला दंड वसूल

ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याबाबद्दल १२२८ लोकांकडून १२ लाख ३५ हजार दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी लघवी करणाऱ्या ३९६६ जणांकडून ८ लाख ८ हजार ६४० रुपये वसूल केले. कचरा जाळणाऱ्या १४२० लोकांकडून ८ लाख ९६ हजार रु वसूल करण्यात आले. कचऱ्याचे वर्गीकरण न केल्याबद्दल ३७६५ लोकांकडून ७ लाख ३० हजार रुपये वसूल करण्यात आले. घरगुती कचरा स्वच्छ च्या लोकांना देण्यास नकार देणाऱ्या २०० लोकांकडून ४१५२० वसूल करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या ४७४५६ लोकांकडून १ कोटी ९६ लाख २६ हजार रुपये वसूल करण्यात आले. बल्क वेस्ट जनरेटर कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद बाबत १४२ लोकांकडून ८ लाख ५५ हजार वसूल केले. बांधकाम राडारोडा टाकणाऱ्या ६२७ लोकांकडून २३ लाख ७२ हजार ६५० वसूलण्यात आले. ११०८ लोकांवर प्लास्टिक कारवाई करत ५६ लाख ५ हजार वसूल करण्यात आले. अशा एकूण ६० हजार २२३ लोकांवर दंड ठोठावत महापालिकेने ३ कोटी २४ लाख ३८ हजार ६८३ रुपये वसूल केले. (Pune Municipal Corporation – PMC)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0