DPDC Pune | जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात पक्षपात महाविकास आघाडी आक्रमक!

Homeadministrative

DPDC Pune | जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात पक्षपात महाविकास आघाडी आक्रमक!

Ganesh Kumar Mule Sep 25, 2024 6:56 PM

PMC election 2022 : Jayant Patil : जयंत पाटील म्हणाले; पुणे महापालिकेत आघाडी हवी!
Ravindra Dhangekar | रविंद्र धंगेकर यांचे आमदार पदी निवड झाल्याचे फ्लेक्स झळकले आणि तात्काळ काढले देखील
Devendra Fadnavis | नेता नाही, नीती नाही, नियत नाही – देवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीवर टीका 

DPDC Pune | जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात पक्षपात; महाविकास आघाडी आक्रमक!

 

Mahavikas Aghadi Agitation – (The Karbhri News Service) – पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी (District Planning and Development Councils) वाटपात व कामे मंजूर करण्यात पक्षपातीपणा होत असल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. (MP Supriya Sule)

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात व कामे मंजूर करण्यात पक्षपातीपणा करत महाविकास आघाडीच्या एकाही आमदाराला एका रुपयाचाही निधी देण्यात आलेला नाही. याउलट महायुतीच्या आमदारांवर मात्र निधीचा पाऊस पाडण्यात आला आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मतदार संघातील जनता ही सरकारला महत्त्वाची वाटत नाही का ? हा प्रश्न विचारत महाविकास आघाडीच्या वतीने पक्षपातीपणाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

या आंदोलनात खासदार सुप्रियाताई सुळे , प्रशांत जगताप, आमदार अशोकबापू पवार, आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथबापू शेवाळे , भारतीताई शेवाळे, स्वातीताई पोकळे, मृणालताई वाणी, स्वातीताई ढमाले , महादेव कोंढरे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.