Sound Pollution Pune Ganesh Immersion | चला! गणेश विसर्जन मिरवणुकीत किमान ध्वनी प्रदूषण बाबत जागृती तर होऊ लागली |  विसर्जनात सरासरी ९४.८ डेसिबल आवाज

Homeadministrative

Sound Pollution Pune Ganesh Immersion | चला! गणेश विसर्जन मिरवणुकीत किमान ध्वनी प्रदूषण बाबत जागृती तर होऊ लागली |  विसर्जनात सरासरी ९४.८ डेसिबल आवाज

Ganesh Kumar Mule Sep 18, 2024 5:22 PM

Baramati Constituency | बारामती लोकसभा मतदार संघातील गडकोट आणि फ्लेमिंगो पक्षी पहायला या | केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना खासदार सुळे यांचे लेखी निमंत्रण
Rain in Dams | पुणे शहरात 26 जुलै पर्यंत पाणीकपात नाही  | महापालिका प्रशासनाचा निर्णय 
Ajit Pawar | NCP Pune | पुणे राष्ट्रवादी कडून अजित पवार यांचे जल्लोषात स्वागत

Sound Pollution Pune Ganesh Immersion | चला! गणेश विसर्जन मिरवणुकीत किमान ध्वनी प्रदूषण बाबत जागृती तर होऊ लागली |  विसर्जनात सरासरी ९४.८ डेसिबल आवाज

 

Pune Ganesh Immersion Sound Pollution – (The Karbhari News Servcie)  – गणेश विसर्जनाच्या निमित्ताने शहरात मोठी धामधूम सुरू होती.  मात्र हा आवाज करत असताना निसर्गाची काळजी गणेश मंडळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून घेतली जात नाही.  याचा लोकांना फक्त त्रास होतो.  विसर्जनाच्या निमित्ताने गेल्या 21 वर्षांपासून पुण्यातील रहिवासी ध्वनिप्रदूषणाने हैराण झाले आहेत.  कोरोना काळातील विसर्जनात ध्वनी प्रदूषणाची पातळी थोडी कमी झाल्याचे दिसून होती. कारण कोरोनामुळे १९ वर्षांतील सर्वात कमी ध्वनी प्रदूषण आढळून आले होते. २०२०-२१ वर्षातील सरासरी आवाज 59.8 डेसिबल होता.  मागील वर्षी मात्र हा आवाज दुपटीने वाढून 105.2 डेसिबल झाला होता. लक्ष्मी रस्त्यावरील नागरिकांचे  जगणे मुश्किल झाले होते. मात्र यंदा हा आवाज काहीसा कमी झालेला दिसून आला. प्रशासनाने डीजे वाजवण्यावर आणलेले निर्बंध यामुळे हे शक्य झाले. तसेच कार्यकर्त्यांनी आणि भाविकांनी देखील ध्वनी प्रदूषण बाबत जागृती केली. गणेश विसर्जन मिरवणुकीत एकंदर आवाज गेल्या वर्षीपेक्षा कमी होऊन सरासरी ९४.८ डेसिबल्स नोंदवला गेला.  सीईओपी तंत्रज्ञान विद्यापीठ च्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी हे मूल्यांकन केले आहे. (Pune Sound Pollution)

– आवाजाचे मापन मुख्य १० चौकांमध्ये केले जाते

दरवर्षी गणेश विसर्जनाच्या निमित्ताने शहरातील प्रमुख १० चौकांचे ध्वनिप्रदूषण मोजण्यासाठी सीईओपी विद्यापीठाच्या  शिक्षक व विद्यार्थ्यांकडून सरावा केला जातो.  यामध्ये बेलबाग चौक, गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, कुंटे चौक, उंबर्या गणपती चौक, भाऊसाहेब गोखले चौक, शेडगे विठोबा चौक, होळकर चौक, लोकमान्य टिळक चौक, खंडूजीबाबा चौक अशा चौकांचा समावेश आहे.  या संदर्भात विद्यापीठाच्या  उपयोजित विज्ञान आणि मानव्यविद्या विभागाचे विभाग प्रमुख  डॉ.महेश शिंदीकर म्हणाले की, महाविद्यालयाकडून गेल्या २३ वर्षांपासून हे काम केले जात आहे.  चालू वर्षातही कॉलेजचे कौतुक झाले.  त्यानुसार अनेक प्रकरणे समोर येत आहेत.

शास्त्रीय पद्धतीने केलेल्या ध्वनी पातळी नोंदीचा उपक्रमः

शिंदीकर म्हणाले की, स्थलकालपरत्वे (spatio-temporal) आणि शास्त्रीय (Scientific) पद्धतीने मोजणी केली जाते. लक्ष्मी रस्त्यावरील २४ तासातील आणि १० चौकातील आवाजाच्या पातळीचा आढावा घेतला जातो. ही सर्व निरीक्षणे केवळ अभ्यास, जनजागृती आणि संशोधन यासाठीच वापरण्यात येतात. कोणत्याही स्रोताच्या संदर्भात या नोंदी घेत नसून या मिरवणुकीच्या दरम्यान चौकात उभ्या असलेल्या सामान्य माणसाच्या कानावर पडणारा आवाज याद्वारे नोंदविला जातो. गेल्या काही वर्षात कार्यकर्ते आणि भाविक यांच्यात ध्वनी प्रदुषणाबाबत जागृती वाढल्याचे निदर्शनास आले. आवाजाच्या पातळी मोजण्याच्या प्रक्रियेबद्दल देखील उत्सुकता जाणवली. मंडळ कार्यकर्ते आणि पोलिसांनी या कामात स्वत:हून मदत केली.

यंदा उत्सवाच्या तयारी दरम्यान वादन पथकांच्या सरावामुळे चिंतीत झालेल्या पुणेकराना प्रत्यक्ष गणेशोत्सव काळात मंडळांच्या अवतीभोवती नेहमीपेक्षा अधिक गर्दी असूनही आवाजाची पातळी निश्चित कमी आढळली होती. मध्य पुण्यात रोषणाई, देखावे इ. अनेक ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रशासन आणि मंडळ व्यवस्थापक यांच्या एकत्रित प्रयत्नातून हे साध्य करता आले. पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावरील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत एकंदर आवाज गेल्या वर्षीपेक्षा कमी होऊन सरासरी ९४.८ डेसिबल्स नोंदवला गेला.

पोलीस आणि प्रशासनाने पहिल्या दिवशी रात्रीपर्यंत केवळ मर्यादित डीजे वादनाला परवानगी दिली आणि अधिकाधिक पारंपारिक वाद्येच लक्ष्मी रस्त्यावर आली. परंतु सकाळी ८ वा. पुन्हा दणदणाट सुरु झाल्याचे आढळून आले.

या उपक्रमात नियोजन: Ira Kulkarni ( इरा कुलकर्णी), Mehar Raghatate (मेहर रघाटाटे) यांच्याकडे होते.

तर विद्यार्थी स्वयंसेवक: Mrunal Khutemate (मृणाल खुटेमाटे), Ishita Humnabadkar (ईशिता हम्नाबादकर), Ayush Lohakare ( आयुष लोहकरे ), Aditya Falke (आदित्य फाळके), Aditya Sanjeevi (आदित्य संजीवी), Tejas Joshi (तेजस जोशी), Mohit Kandalkar (मोहित कंडाळकर), Ruturaj Malode (ऋतुराज मालोडे), Shreya Shinde (श्रेया शिंदे), Vasundhara Janawade (वसुंधरा जानवडे), Prem Dupargude (प्रेम दुपारगुडे), Kshitija Metkari (क्षितिजा मेटकरी), Abhiraj Vaidya (अभिराज वैद्य), Shruti Kulkarni (श्रुती कुलकर्णी ), Shreya Karande (श्रेया कारंडे ), Saurish Dange (सौरीश डांगे), Vaibhav Bhargal (वैभव भारगळ), Vedant Gondhalekar (वेदांत गोंधळेकर), Soham Bingewar ( सोहम बिंगेवार), Ashish Dhage (आशिष ढगे) हे होते.

 

 – आवाज पातळी ?

वर्ष.       आवाज पातळी (डेसिबल) 

2008   101.4

2010   100.9

2012.   104.2

2013.   109.3

2016.    92.6

2018.    90.4

2019.    86.2

2020.    59.8

2022.     102.5

2023.      101.2

2024.      94.8


केंद्रीय प्रदूषण मंडळ, केंद्रीय वने, पर्यावरण आणि वातावरण बदल विभाग यांनी अशी दिली आहे आवाजाची मर्यादा (आकडे डेसिबल मध्ये)

–                                    दिवसा                      रात्री

औद्योगिक क्षेत्र –          ७५                                ७०

व्यापारी क्षेत्र                ६५                                 ५५

निवासी क्षेत्र                   ५५                                 ४५

शांतता क्षेत्र                   ५०                                  ४०

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0