Ladki Bhahin Yojana |आम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिण कधी होणार? | अंगणवाडी सेविकांच्या संतप्त सवाल

HomeBreaking News

Ladki Bhahin Yojana |आम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिण कधी होणार? | अंगणवाडी सेविकांच्या संतप्त सवाल

Ganesh Kumar Mule Sep 11, 2024 5:20 PM

Majhi Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभ वितरणाचा कार्यक्रम | लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट देण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री येणार
Majhi Ladki Bahi Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता केवळ अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यात येणार | जिल्हा महिला व बालविकास अधिकारी
Ladki Bahin Yojana Maharashtra | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ; बहिणींच्या आनंदसोहळ्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सहभागी

Ladki Bhahin Yojana |आम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिण कधी होणार? | अंगणवाडी सेविकांच्या संतप्त सवाल

 

Anganwadi Sevika – (The Karbhari News Service) – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचवण्यात सर्वात मोठी भूमिका ही अंगणवाडी सेविकांची राहिली आहे. ग्रामीण भागातील खूप महिला अशिक्षित असतात. त्यांना आपले कोणतेही अर्ज स्वतः भरणे शक्य होत नाही त्यामुळे शासनाने अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाऊन आपला अर्ज भरावा असं आवाहन केलं होत. त्यानुसार जिल्ह्यानुसार लाखो लाभार्थी महिलांचे अर्ज यशस्वीरित्या अंगणवाडी सेविकांनी भरले.

तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थ्यांची ऑनलाईन पोर्टलवर यशस्वी नोंदणी झाल्यानंतर प्रति यशस्वी पात्र लाभार्थी (प्रती अर्ज मागे) रूपये ५० याप्रमाणे अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता देणार असे शासनाचे निर्देश होते. त्यानंतर जिल्हानिहाय मेळावे साठी लाभार्थ्यांना घेऊन जाण्याची जबाबदारीही अंगणवाडी सेविकांना देण्यात आली होती. एवढं सगळं करूनही आतापर्यंत एकही अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही.

याबाबत अंगणवाडी सेविकांची संघटना असलेल्या राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी सांगितले कि, देशाची भावी पिढी सुदृढ व निरोगी राहावी यासाठी अंगणवाडी केंद्रात ० ते ६ वर्ष वयोगटातील बालके, गर्भवती व स्तनदा माता यांना पूरक पोषण आहार, पूर्व शालेय शिक्षण, लसीकरण, आरोग्य तपासणी आणि पोषण व आरोग्य विषय शिक्षण या आरोग्य विषयक सेवा राबववाण्याच काम सेविका करत असतात. यातील बहुतांश अंगणवाडी सेविका ह्या एकल,विधवा,परितक्त्या आहेत व अतिशय कमी मानधनात काम करत आहेत असे असूनही शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. सातत्याने विविध प्रश्न घेऊन प्रशासकीय पातळीवर महिला व बालविकास विभागाचा उंबरठा झिजवावा लागतो हे प्रश्न सुटत नसतानाच आता प्रोत्साहन भत्ता मिळावं यासाठी पण लढावं लागणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0