PMPML Pune | गणेश उत्सवात रात्री १२ नंतर कुठल्याही प्रकारचे पास चालणार नाहीत | पीएमपी प्रशासनाची माहिती
Pune Ganesh Utsav – (The Karbhari News Service) – गणेशोत्सव कालावधीत देण्यात येणारी ही रात्री बससेवा खास बससेवा असल्याने सर्व पासधारकांस रात्री १२.०० वाजेपर्यंत पासाची सवलत ठेवण्यात आलेली आहे. रात्री १२.०० नंतर कुठल्याही प्रकारचे पास चालणार नाहीत. अशी माहिती पीएमपी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. (PMP Bus Pune)
दरवर्षी प्रमाणे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ७ ते १७ सप्टेंबर या कालावधीमध्ये गणेशोत्सव साजरा होत असून गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी शहराबाहेरून व शहरांतर्गत नागरिक मोठ्या प्रमाणावर येत असतात. तसेच पिंपरी-चिंचवड शहरामधून पुणे शहरामध्ये गणेशोत्सव देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या पाहता पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य बस स्थानकांवरून दरवर्षी प्रमाणे यंदाही गर्दीनुसार रात्रभर बससेवा पुरविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
२७० बसेस या रात्रपाळीकरीता गणेशोत्सव कालावधीमध्ये वरील तक्त्यात नमूद स्थानकांवरून संचलनात ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. गणेशोत्सव कालावधी मध्ये नियमित मार्गाच्या बसेसच्या फेऱ्या वगळून जादा देण्यात येणाऱ्या फेऱ्या यात्रा स्पेशल म्हणून संचलनात राहतील व अशा फेऱ्यांसाठी रात्रौ १०.०० नंतर प्रचलित दरामध्ये रूपये ५/- जादा दर आकारणी करण्यात येईल.
श्री गणेशोत्सव कालावधीत वर दर्शविलेल्या तक्त्यामधील पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य बस स्थानकांवरून मनपा भवन पर्यंत रात्रौ गरजेनुसार बससेवा देण्यात येणार आहे. तसेच मुख्य स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी अधिकारी/कर्मचाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे, याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.
COMMENTS