Pune Municipal Corporation (PMC) – मूर्ती आमची, किमंत तुमची! पर्यावरणपूरक  गणेशोत्सव साठी पुणे महापालिकेचे पाऊल

Homeadministrative

Pune Municipal Corporation (PMC) – मूर्ती आमची, किमंत तुमची! पर्यावरणपूरक  गणेशोत्सव साठी पुणे महापालिकेचे पाऊल

Ganesh Kumar Mule Sep 05, 2024 9:18 PM

CM Eknath Shinde | शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर घेतलेल्या निर्णयांची तात्काळ अमंलबजावणी | जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
MLA Mukta Tilak | MLA Laxman Jagtap | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून टिळक कुटुंबियांचे सांत्वन | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून आमदार जगताप यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन 
Davos | Maharashtra News | दावोसमध्ये महाराष्ट्राने केले ३ लाख ५३ हजार कोटींचे विक्रमी सामंजस्य करार

Pune Municipal Corporation (PMC) – मूर्ती आमची, किमंत तुमची! पर्यावरणपूरक  गणेशोत्सव साठी पुणे महापालिकेचे पाऊल

 

Pune Ganesh Utsav 2024 – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिके (PMC Pune) तर्फे पर्यावरण पूरक  गणेशोत्सव साजरा करणे साठी नागरिकाना आवाहन करण्यात आले आहे. आपल्या घरी गणपती बसविताना नैसर्गिक साहित्य , जैवविघटनशील व पर्यावरणास अनुकूल साहित्य वापरून मूर्तीची सजावट करण्यात यावी व POP ची मूर्ती न वापरता नागरिकांनी शाडू मातीच्या मूर्ती खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे. असे आवाहन पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.  (Pune PMC News)

पुणे महानगरपालिका पर्यावरण विभाग व लिबर्टी अर्थवेअर आर्ट यांच्या मदतीने फक्त शाडू मातीची मूर्ती “ मूर्ती आमची , किमंत तुमची” हा उपक्रम हाती घेतला आहे. शाडू माती चा वापर करून भक्ती संगम प्रकारच्या माती च्या मूर्ती उपलब्ध करण्यात आल्या आहे. या मूर्ती चे वैशिष्ट्य म्हणजे ही अवघ्या दोन तासात पाण्यात विरघळतात व विसर्जन केल्यानंतर चे पाणी घरगुती कुंडी मध्ये वापरता येते.

“ मूर्ती आमची , किमंत तुमची “ उपक्रम घोले रोड आर्ट गॅलरी, घोले रोड , शिवाजीनगर , पुणे येथे दिनांक ५, ६ व ७ सप्टेंबर २०२४ दरम्यान सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत असून नागरिकांसाठी पर्यावरण पूरक मूर्ती उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तरी सर्व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा. असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0