Pune Ganesh Utsav 2024 | पर्यावरणपूरक गणेशोत्सव व गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नियोजन 

Homeadministrative

Pune Ganesh Utsav 2024 | पर्यावरणपूरक गणेशोत्सव व गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नियोजन 

Ganesh Kumar Mule Sep 03, 2024 9:15 PM

MLA Ravindra Dhangekar | गणेशोत्सवासाठी टिळक पुतळा मेट्रोचे काम १ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करा | आमदार रवींद्र धंगेकर
Pune Traffic | दहीहंडी उत्सवात नागरिकांची कोंडी; गणेशोत्सवात वाहतूक नियोजन नीट व्हावे | भाजप प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी 
PMPML Pune | गणेश उत्सवात रात्री १२ नंतर कुठल्याही प्रकारचे पास चालणार नाहीत | पीएमपी प्रशासनाची माहिती 

Pune Ganesh Utsav 2024 | पर्यावरणपूरक गणेशोत्सव व गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नियोजन

 

PMC Solid Waste Management Department – (The Karbhari News Service) – पर्यावरणपूरक गणेशोत्सव व गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाची पूर्वतयारी झाली आहे.  सालाबादप्रमाणे सन २०२४ मधील सार्वजनिक गणेशोत्सव ७ ते १९ सप्टेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार असून या गणेशोत्सव कालावधीत पुणे महानगरपालिकेमार्फत नियोजन करण्यात आले आहे.  अशी अहिती उपायुक्त संदीप कदम यांनी दिली. (Sandeep Kadam PMC)

 

पर्यावरणपूरकरित्या गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात आले असून पुणे महानगरपालिकेच्या सोशल मिडीया माध्यमादवारे, VMDs, होर्डिंग्ज, बनसे, पोस्टर्स इ. ‌द्वारे जनजागृती करण्यात आली आहे. तसेच कोणीही निमौल्य नदीपात्र तलावात टाकू नये असे देखील आवाहन मा महापालिका आयुक्त यांनी सर्व पुणेकर नागरिकांना करण्यात येत आहे.

पुणे महानगरपालिकेमार्फत सर्व नागरिकांना नैसर्गिक स्त्रोतात मूर्ती विसर्जन न करता पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याकरीता गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन हाँदाद्‌वारे मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात येणार आहे.

गणेशोत्सव २०२४ कालावधीमध्ये १५ क्षेत्रिय कार्यालयातर्गत एकूण ४२ बांधलेले हौद, एकूण २६५ ठिकाणी ५६८  टाक्या याठिकाणी मूती विसर्जनाची सोय करण्यात येणार आहे. नागरिकांनी नैसर्गिक स्त्रोतात मूर्ती विसर्जन न करता जास्तीत जास्त प्रमाणात मूर्ती दान करावे याबाबत क्षेत्रिय कार्यालयामार्फत जनजागृती करण्यात येत आहे.

क्षेत्रिय कार्यालयांतर्गत सर्व कृत्रिम हौद व मूली संकलनाच्या ठिकाणी निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी २५६ निर्माल्य कलश/कटेनरची व्यवस्था करण्यात येणार आहे.

पुणे महानगरपालिकेमार्फत उभारण्यात आलेल्या सर्व यंत्रणाची सविस्तर माहिती www.pmo.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

गणेशोत्सव २०२४ मध्ये पुणे महानगरपालिका व विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत पुनरावर्तन उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये ECOEXIST संस्था, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था व इतर विविध स्वयं सेवी संस्थांमार्फत गणेश विसर्जनानंतरची शाडूची माती सकलित करून त्याचा पुर्नवापर केला जाणार आहे. शाडू माती एक मर्यादित संसाधन असून या मातीच्या उत्खननामुळे पर्यावरणाचा हास होत आहे. मातीच्या मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे गाळ निर्माण होऊन नदीपात्रात गाळ साठल्याने सागरी जीवनावर परिणाम होतो. या शाडू मातीचा पुर्नवापर केल्यास मूर्तीकाराना मूर्ती/माती परत देऊन त्यांना मदत करता येऊ शकते. पुनरावर्तन उपक्रमाबाबतची सविस्तर माहिती व शाडू माती संकलनाच्या केंद्राविषयीची सविस्तर माहिती www.punaravartan.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

निर्माल्यामध्ये केवळ हार, पाने, फुले एवढ्‌याच गोष्टीचा समावेश होतो. त्यामध्ये प्लास्टिक, थर्माकॉल, कापडी वस्तू किंवा तसबिरी, मुर्त्या किंवा त्यांचे अवशेष तसेच कुठलेही खाद्यपदार्थ टाकू नयेत. हे प्रासादिक निर्माल्य एकत्र करून त्याचे खल बनवून शेतक-यांना देण्यात येते. म्हणूनच या प्रासादिक निर्माल्याचे पावित्र्य भंग पावेल अशा कुठल्याही वस्तू किंवा इतर कचरा निमौल्यात टाकू नये असे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात येत आहे. क्षेत्रिय कार्यालयामार्फत संकलित केलेल्या गणेश मूतीचे पुर्नविसर्जन करणेची व्यवस्था वाघोली येथील खाणीमध्ये तीन पाळ्यांमध्ये आवश्यक सेवक व पर्यवेक्षकीय अधिकारी नेमून घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत करण्यात येणार आहे. सर्व क्षेत्रिय कार्यालयांना गणेशोत्सव कालावधीत पुणे शहरात सर्वत्र सार्वजनिक स्वच्छता राखली जाण्याच्या अनुषगाने सर्व सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, ओपन प्लॉट, क्रॉनिक स्पॉट, नदीपात्र, नदीघाट, विसर्जन हौदांची ठिकाणे, सार्वजनिक गणेश मंडळांचे परिसर या सर्व ठिकाणी स्वच्छता राखणेबाबत सूचित करण्यात आले आहे.

वाघोली येथील खाणीच्या ठिकाणी जीवरक्षकांची नेमणूक नगररोड-वडगावशेरी क्षेत्रिय कार्यालयाकडून व सुरक्षा विभागाकडून रखवालदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. क्षेत्रिय कार्यालयाच्या मागणीनुसार आवश्यक गाड्‌याची उपलब्धता मोटार वाहन विभागाकडून करण्यात येणार आहे. या गणेशमुल्यांचे पुर्नविसर्जन सन्मानपूर्वकरित्या वाघोली येथील खाणीमध्ये करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी, मा. प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ  पोलीस आयुक्त तसेच  पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण तसेच याना कळविण्यात येणार आहे

पुणे महानगरपालिकेमार्फत अग्निशामक दलाची सुसज्ज यंत्रणा ठेवण्यात येणार आहे तसेच आपत्ती व्यवस्थापनाबाबत योग्य ते नियोजन करण्यात येणार आहे. वाघोली येथे खाणीमध्ये गणेशमुल्यांचे पुर्नविसर्जन करणेबाबत परिमंडळ निहाय गणेशमुत्यांचे पुर्नविसर्जन करण्यात येणार आहे.

पुणे महानगरपालिकेमार्फत गणेशोत्सव कालावधीमध्ये आवश्यकतेनुसार मोबाईल टॉयलेट व्यवस्था करण्यात येणार आहे.

जास्तीत जास्त नागरिकांनी मूती दान करावे याकरीता नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी भूमी ग्रीन संस्थे माफेल सेंद्रीय खताच्या १५००० बॅग्ज (३ किलो खत प्रति बॅग) विसर्जन हौदाचे ठिकाण उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0