BJP Pune Agitation | बदलापूर च्या दुर्दैवी घटनेचे राजकारण करणे महाविकास आघाडी ला शोभत नाही | धीरज घाटे
Badlapur News – (The Karbhari news Service) – बदलापूरमधील दुर्दैवी घटनेनंतर त्यावरून राजकारण करण्याचा प्रयत्न राज्यातील विरोधकांकडून सुरू आहे. त्याचा शनिवारी पुणे शहर भारतीय जनता पार्टीकडून निषेध करण्यात आला. त्यानिमित्त काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली. (Pune News)
या प्रकरणात राज्यातील महायुतीचे सरकार संवेदनशील आहे. संबंधित आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टाकडून लवकरच शिक्षा सुनावली जाईल. पण अशा पद्धतीने संवेदनशील प्रकरणात राजकारण करण्याचा प्रयत्न करणे निषेधार्ह आणि महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारे नाही. त्यामुळेच आम्ही सर्वांनी याचा निषेध करतो असे शहराध्यक्ष धीरज घाटे या वेळी बोलताना म्हणाले.
महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, प्रत्येकाच्या पूर्ण नावामध्ये आईच्या नावाचा समावेश करणे, मुलींसाठी मोफत शिक्षण, असे महत्त्वाचे निर्णय घेतले असून, महिला सबलीकरणासाठी सरकार कायम अग्रेसर असल्याचे सिद्ध झाले आहे असे प्रतिपादन घाटे यांनी केले
यावेळी आमदार भीमराव अण्णा तापकीर, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा हर्षदाताई फरांदे, पुणे शहर सरचिटणीस रवि साळेगावकर, पुनीत जोशी, वर्षाताई तापकीर, गायत्रीताई खडके, प्रियांकाताई शेंडगे, अजय खेडेकर, सुनील पांडे, भावनाताई शेळके, प्राजक्ताताई गांगे, दीपक पोटे, पुष्कर तुळजापूरकर, इम्तियाज मोमीन, सुरज दुबे, शैलेश बडदे, गणेश बगाडे, अरुण राजवाडे, अतुल साळवे, गिरीश खत्री, आशिष कांटे, किरण ओरसे, आप्पा घनवट, प्रतिक देसरडा, राकेश बनसोड यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS