PMC Sports Department | पुणे महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने १५ ऑगस्टला सायकल रॅली!

रॅलीचा फ्लॅग ऑफ महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांचे शुभहस्ते होणार

Homeadministrative

PMC Sports Department | पुणे महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने १५ ऑगस्टला सायकल रॅली!

Ganesh Kumar Mule Aug 12, 2024 12:04 PM

PMC Employees Transfers | 8 उप अधीक्षक आणि 100 वरिष्ठ लिपिकांच्या होणार नियतकालिक बदल्या 
77th Independence Day | PMC Pune | पुणे महानगरपालिकेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
Fursungi -Uruli Devachi Municipal Corporation | फुरसुंगी व उरुळी देवाची नगरपरिषदेला पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी पुणे महापालिकेवरच! | राज्य सरकार कडून आदेश जारी

PMC Sports Department | पुणे महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने १५ ऑगस्टला सायकल रॅली!

 

PMC Cycle Rally – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या (PMC Sports Department) वतीने व पुणे महानगरपालिका सायकल क्लबचे (PMC Cycle Club) सहकार्याने 15 ऑगस्ट 2024रोजी हर घर तिरंगा भव्य सायकल रॅली 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.20वाजता मनपा मुख्य भवन येथून आयोजित करण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation- PMC)

रॅलीचा फ्लॅग ऑफ महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांचे शुभहस्ते होणार आहे .सदर रॅलीमध्ये सहभागी सायकल स्वारास टी-शर्ट, मेडल देण्यात येणार असून चहा व नाश्त्याची सोय करण्यात आली आहे. (Pune PMC News)

रॅलीमध्ये 18 ते 60 वयोगटातील सर्व स्त्री, पुरुषास सहभाग घेता येईल व सदर रॅली सर्वांसाठी विनामूल्य आहे. सकाळी 6 वाजता टी शर्ट वाटप सुरू करण्यात येईल.

सायकल रॅली मध्ये सहभागी होण्यासाठी सोबतच्या लिंक वर क्लिक करून आपला सहभाग निश्चित करावा. :

रॅलीमार्ग : मनपा भवन – मॉडर्न कॅफे – जंगली महाराज रोड – अलका टॉकीज चौक – टिळक रोड – अभिनव कॉलेज – बाजीराव रोड – मनपा भवन.

सायकल रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी खालीलप्रमाणे फॉर्म भरावा. सर्वांना टि- शर्ट, मेडल देण्यात येणार आहे. प्रवेश विनामूल्य. काही शंका असल्यास खालील क्रमांकावर संपर्क करावा.

संपर्क क्रमांक : ९६८९९३६५१८ / ९६०४५४९५७८ / ९६८९९३१०९४ / ८६६८७१२३८२ / ९२२५५२५५०७ / ९८५०११८९२४

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0