Educational Award : पालिकेतर्फे आता सुरु होणार सावित्रीबाई फुले शैक्षणिक पुरस्कार :नगरसेविका अर्चना पाटील यांच्या मागणीला यश

HomeपुणेPMC

Educational Award : पालिकेतर्फे आता सुरु होणार सावित्रीबाई फुले शैक्षणिक पुरस्कार :नगरसेविका अर्चना पाटील यांच्या मागणीला यश

Ganesh Kumar Mule Oct 06, 2021 3:55 PM

PMC Employees Identify | पुणे महापालिकेतील कायम कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे आता वेगवेगळी असणार! | फसवणूक टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाचा निर्णय 
Bonus : मनपा कर्मचाऱ्यांच्या बोनसला स्थायी समितीची देखील मान्यता
PMC Fire Department warns punekar… If buildings and establishments do not have a fire system…! 

पुणे पालिकेतर्फे आता सुरु होणार सावित्रीबाई फुले शैक्षणिक पुरस्कार

:नगरसेविका अर्चना पाटील यांच्या मागणीला यश

पुणे: पुणे शहरात वर्षभर विविध साहित्य विषयक संमेलने, व्याख्यानमाला आयोजित केले जात असतात. पुणे मनपाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने दरवर्षी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सावित्रीबाई फुले स्मारक गंज पेठ येथे व्याख्यानमाला सुरु करण्यात यावी तसेच महिला शिक्षण क्षेत्रात नेत्र दीपक कामगिरी बजविणार्‍या महिलेस पुणे मनपाच्या वतीने सावित्रीबाई फुले शैक्षणिक पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी नगरसेविका अर्चना पाटील यांनी केली होती. याला आज पक्षनेत्यांच्या बैठकीमध्ये मंजूरी देण्यात आली.

 : पक्षनेत्यांच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर

पुणे शहर हे विद्येचे माहेर घर म्हणून देशभरात ओळखले जाते. साक्षरता हया विषयासाठी फुले दाम्पत्य यांनी केलेल्या कार्याचा गौरव इंग्रजांनी पण केला आहे. महिलांनी शिक्षण घेणे हे ज्या सनातनी काळात पाप मानले जायचे त्या काळात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची पुणे शहरात पहिल्यांदा मुहूर्तमेढ रोवली.

आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी बजावत आहेत सर्व सामान्य माहिलेपासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी नेत्रदीपक यश मिळविले आहे याचे सर्व मूळ क्रांतीज्योती सावित्रीबाई तपश्चर्ये मध्ये दडलेले आहे. पुणे शहरात साहित्य, क्रीडा, कला, अभियांत्रिकी, व्यवसाय इ. सर्व क्षेत्रात स्त्रीया पुरुषांच्या बरोबरीने सक्षमतेने कार्यरत आहेत. अशा स्त्रियांचा  गौरव करण्यात यावा. आज सावित्रीबाईंच्या नावाने पुरस्कार सुरु करण्यात येत असल्याचा मला खूप आनंद होत आहे. या पुरस्कारामुळे अनेक महिला सवित्रीबाईंची प्रेरणा घेऊन स्वता; चे आयुष्य घडवतील असे पाटील यांनी सांगितले.

 

पुणे शहरात साहित्य, क्रीडा, कला, अभियांत्रिकी, व्यवसाय इ. सर्व क्षेत्रात स्त्रीया पुरुषांच्या बरोबरीने सक्षमतेने कार्यरत आहेत. अशा स्त्रियांचा  गौरव करण्यात यावा. आज सावित्रीबाईंच्या नावाने पुरस्कार सुरु करण्यात येत असल्याचा मला खूप आनंद होत आहे. या पुरस्कारामुळे अनेक महिला सवित्रीबाईंची प्रेरणा घेऊन स्वता; चे आयुष्य घडवतील असे पाटील यांनी सांगितले.

अर्चना पाटील, नगरसेविका

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0