site visit : मुसळधार पावसाचा फटका मंगळवार पेठेला : सभागृह नेता व महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

HomeपुणेPMC

site visit : मुसळधार पावसाचा फटका मंगळवार पेठेला : सभागृह नेता व महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

Ganesh Kumar Mule Oct 05, 2021 4:49 PM

Pune News | अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस व पालिका प्रशासनाने एकत्रितपणे काम करावे — राज्यमंत्री माधुरी मिसाळ
  75 lakhs sanctions by PMC Standing Committee for salary of Software engineers of  property tax department
Municipal Election | PMC Election | महापालिका निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये? 

मुसळधार पावसाचा फटका मंगळवार पेठेला

: सभागृह नेता व महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

पुणे: शहरात सोमवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मंगळवार पेठेतील काही भागाला बसला. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साठले होते. महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी मंगळवारी सकाळी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यासह सहाय्यक क्षेत्रीय आयुक्त आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

:उपाययोजना करण्याच्या सूचना

शहरातील अनेक भागांमध्ये सोमवारी संध्याकाळनंतर सलग दोन ते अडीच तास झालेल्या पावसामुळे ६९ मंगळवार पेठेतील रस्त्यावर पाणी साचले होते. तर या परिसरातील काही कुटुंबांचे या पावसामुळे नुकसान देखील झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी या भगाला भेट देत आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या ठिकाणी असलेल्या नाल्यावर कायमस्वरूपी काम करून घ्यावे जेणेकरून अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही, असेही पालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना बजाविले. आशिष महादळकर, अविनाश संकपाळ, संतोष तांदळे यांच्यासह इतर अधिकारी आणि स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते.