PMC Additional Commissioner | मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या पेक्षा माझी सेवाज्येष्ठता वरिष्ठ! | श्रीनिवास कंदूल यांनी अतिरिक्त आयुक्त पद देण्याची प्रधान सचिवांकडे केली मागणी
कंदूल यांनी प्रधान सचिवांना लिहिलेल्या पत्रानुसार शासन निर्णयानुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त पदासाठी पुणे महानगरपालिकेच्या सेवेतील शासन निर्णयात नमूद केलेली आवश्यक पात्रता धारण करणाऱ्या पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकाऱ्यांची सूची तयार करताना सेवा जेष्ठता दाखविण्यात आलेली आहे. त्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची सेवा जेष्ठता माझ्या पेक्षा वरिष्ठ असल्याचे दाखविण्यात आले ते चुकीचे आहे. यांचे ग्रेड पे S-23 असून जे पद कार्यकारी अभियंता यांचा सम कक्षात आहे. कारण कार्यकारी अभियंता यांचे ग्रेड पे S-23 आहे. म्हणून मुख्य अभियंता यांचे अनुभव विचारात घेताना कार्यकारी अभियंता या पदाचे अनुभव विचारात घ्यावा. कारण मुख्य लेखापाल व कार्यकारी अभियंता (S-23) ही पदे उप आयुक्त (S-23) या पदाशी समकक्ष आहेत.
कंदूल यांनी पत्रात पुढे म्हटले आहे कि, श्री व्ही. जी. कुलकर्णी मुख्य अभियंता यांची सेवा निवृती ऑक्टोबर २०२३ मध्ये आहे. तसेच श्री श्रीनिवास बोनाला मुख्य अभियंता यांची निवृती माहे जुलै २०२४ मध्ये असून ते अतिरिक्त महापालिका आयुक्त या पदावर इच्छुक नाही. त्यामुळे मी सर्वात जेष्ठ असल्याने माझ्या नावाचा विचार करण्यास विनंती आहे. मी सन १९८९ ते १९९९ या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र शासन पाटबंधारे खाते येथे सहाय्यक अभियंता श्रेणी २ या पदावर १० वर्षे कार्यरत होतो. पूर्वी नगर उप अभियंता हे पद विद्युत विभागाकडे खाते प्रमुख म्हणून होते. मी कार्यकारी अभियंता (नगर उप अभियंता) या पदावर दिनांक २९/१०/१९९९ पासून २५/०७/२०११ अखेर सलग १० वर्षे ९ महिने कार्यरत होतो. तदनंतर मी पदोन्नतीने अधिक्षक अभियंता या पदावर दिनांक २६/०७/२०११ पासून ०३/०४/२०१८ अखेर सलग ६ वर्ष ९ महिने कार्यरत होतो. तदनंतर दि. ०४/०४/२०१८ पासून पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागामध्ये मुख्य अभियंता (विद्युत) हे नव निर्मित पद निर्माण झालेनंतर आज अखेर म्हणजे सलग ५ वर्षे ६ महिने मुख्य अभियंता (विद्युत) या पदावर कार्यरत आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंता (S-23) हे पद उप आयुक्त (S-23) या पदाशी समकक्ष विचारात घेता तसेच पुणे मनपा मध्ये विद्युत विभागाचे खाते प्रमुख (नगर उप अभियंता (विद्युत)) या श्रेणी १ चे पदावर दिनांक २९/१०/१९९९ रोजी माझी सरळ सेवेने नियुक्ती झाल्याने माझा २४ वर्षे इतका प्रदीर्घ अनुभव विचाराधीन आहे.
तरी वरील सर्व बाबींचा विचार करून गुणवत्ता, शैक्षणिक पात्रता (B.E. & MBA) व क्षमता इ. बाबींचा विचार करून मुख्य अभियंता पदावर झालेला अन्याय दूर करून यापुढे अतिरिक्त महापालिका आयुक्त या पदावर पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील मुख्य अभियंता पदावरील (S-27) अधिकाऱ्यांची सेवाजेष्ठता तयार करताना दि. २९/१०/१९९९ रोजी पासून कार्यकारी अभियंता (S-२३) पदावरील अनुभवाचा विचार करून सेवा जेष्ठता यादी तयार करावी. अशी मागणी कंदूल यांनी केली आहे.