Potholes in Pune | 7 ऑक्टोबर पर्यंत खड्डे बुजवण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश | अन्यथा संबंधित कनिष्ठ अभियंत्यांवर होणार कारवाई!

HomeपुणेBreaking News

Potholes in Pune | 7 ऑक्टोबर पर्यंत खड्डे बुजवण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश | अन्यथा संबंधित कनिष्ठ अभियंत्यांवर होणार कारवाई!

Ganesh Kumar Mule Oct 04, 2023 1:03 PM

Additional commissioner Vikas Dhakne | भाजपाच्या एका बड्या नेत्याच्या मदतीने विकास ढाकणे यांना पुणे मनपात येण्याची मिळाली संधी!
PMC Pune Employees Workshop | महापालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत कार्यशाळेत विचारमंथन
PMC Unique Pune Walk | पुणे महापालिकेचा पहिला “युनिक पुणे वॉक”

Potholes in Pune | 7 ऑक्टोबर पर्यंत खड्डे बुजवण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश | अन्यथा संबंधित कनिष्ठ अभियंत्यांवर होणार कारवाई!

Potholes in Pune | पुणे | पुणे शहरात नुकत्याच पडून गेलेल्या पावसाने सर्व महत्वाच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य (Pune Potholes) झाले आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत महापालिका प्रशासन सतर्क झाले असून 7 ऑक्टोबर पर्यंत खड्डे बुजवण्याचे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (PMC Additional Commissioner Vikas Dhakane)!यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. अन्यथा 9 ऑक्टोबर पासून संबंधित कनिष्ठ अभियंता (JE) यांच्यावर कारवाई करण्यात येईल. अशी माहिती विकास ढाकणे यांनी दिली. (Pune Municipal Corporation)
शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर खड्डे झाले आहेत. विशेष म्हणजे हे खड्डे खूपच मोठे आहेत. ज्यामुळे नागरिकांना गाडी चालवणे देखील जिकिरीचे झाले आहे. याबाबत नागरिकांकडून महापालिका प्रशासनाकडे तक्रारीचा ओघ सुरु झाला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला देखील याची दखल घेणे भाग पडले आहे. त्यानुसार प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याचे काम सुरु झाले आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले कि आम्ही सर्व प्रमुख रस्त्यांची स्थिती जाणून घेतली आहे. त्यानुसार खड्डे बुजवण्याचे काम सुरु झाले आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडील रस्ता दुरुस्ती करणाऱ्या गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आज 15 गाड्या सिंहगड रस्त्यावर दुरुस्तीच्या कामासाठी पाठवण्यात आल्या. त्यानुसार काम करण्यात आले. उद्या कात्रज कोंढवा रोड वर 5 गाड्या तैनात करण्यात येतील. त्यानंतर नगर रोड, मगरपट्टा रोड, अशा सर्व रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती केली जाईल. (PMC Pune)
पथ विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांना खड्डे बुजवण्यासाठी 7 ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत हे झाले नाही तर 9 ऑक्टोबर पासून संबधित कनिष्ठ अभियंता यांच्यावर कारवाई केली जाईल.
विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा 
—–