Dr Rajendra Bhosale IAS | सिंहगड रोड आणि पाणी शिरलेल्या विविध भागात महापालिका आयुक्त यांच्याकडून पाहणी आणि घेतला गेला आढावा 

HomeBreaking Newsपुणे

Dr Rajendra Bhosale IAS | सिंहगड रोड आणि पाणी शिरलेल्या विविध भागात महापालिका आयुक्त यांच्याकडून पाहणी आणि घेतला गेला आढावा 

गणेश मुळे Jul 27, 2024 11:27 AM

Dr Rajendra Bhosale IAS | खातेप्रमुखांच्या बैठकीत महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना केल्या कडक सूचना | आपत्कालीन परिस्थितीशी तोंड देण्यास सज्ज राहण्याचे आदेश
Why are you working till the midnight of 13th April to prepare for Ambedkar Jayanti? | Pune Municipal Commissioner’s question to the officials
PMC will prepare a policy to solve the problems of Punekar citizens!

Dr Rajendra Bhosale IAS | सिंहगड रोड आणि पाणी शिरलेल्या विविध भागात महापालिका आयुक्त यांच्याकडून पाहणी आणि घेतला गेला आढावा

PMC Commissioner – (The Karbhari News Service) – २५ जुलै ला झालेल्या पावसाने सिंहगड रोड परिसरातील नागरिकांना भयानक प्रसंगाला सामोरे जावे लागले. एकता नगर भागात रहिवाशांना खूप त्रास सहन करावा लागला. पाऊस ओसरल्या नंतर महापालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. याची पाहणी महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी आज सकाळी केली. यावेळी सर्व उपायुक्त आणि विभागप्रमुख उपस्थित होते. (Pune Municipal Corporation (PMC)
एकता नगर भागात घनकचरा विभाग, ड्रेनेज विभाग आणि स्वच्छ च्या कर्मचाऱ्यानी सगळी स्वच्छता केली आहे. त्या परिसरात पाणी आल्याचा मागमूस देखील नाही. याबाबत आयुक्तांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे.
तसेच आयुक्त तथा प्रशासक मा.डॉ.राजेन्द्र भोसले यांनी डेक्कन येथील भिडे पूल, रजपूत झोपडपट्टी, एस.एम. जोशी पूल, गरवारे कॉलेजच्या पाठीमागे बाजू, ओंकारेश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर पुलाची वाडी अशा विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. पुण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुठा नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे हा भाग पाण्यात गेला होता. यावेळी आयुक्त यांनी येथील परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी मनपाच्या इतर विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यक ते निर्देश दिले आहेत.

– आरोग्य प्रमुख यांची अनुपस्थिती आयुक्तांना खटकली

दरम्यान महापालिका आयुक्त यांनी सकाळी ८ वाजल्या पासूनच विविध भागांना भेटी सुरु केल्या होत्या. या पाहणी दौऱ्यासाठी सर्व उपायुक्त आणि विभाग प्रमुखांना उपस्थित राहण्याचे सूचित करण्यात आले होते. मात्र यावेळी नवीनच नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्य प्रमुख  डॉ निना बोराडे या उपस्थित नव्हत्या. आयुक्त कार्यालयातून त्यांना वारंवार संपर्क केला गेला. मात्र त्यांचा संपर्क झाला नाही. याबाबत आयुक्त भोसले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. डॉ बोराडे यांना नुकतेच महापालिका आरोग्य प्रमुख पदी राज्य सरकार कडून नेमण्यात आले आहे. त्यांनी कालच पदभार स्वीकारला आहे. मात्र त्यांना पुण्यातील पुराची तीव्रता जाणवली नाही, अशी चर्चा आता केली जात आहे.