Pune Rain Update | पुणे आणि परिसरातील शाळा आज बंद राहणार | जिल्हाधिकारी यांचे आदेश

HomeपुणेBreaking News

Pune Rain Update | पुणे आणि परिसरातील शाळा आज बंद राहणार | जिल्हाधिकारी यांचे आदेश

गणेश मुळे Jul 25, 2024 2:39 AM

Black Spot in Pune |  ब्लॅक स्पॉट बाबत जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले महत्वाचे आदेश! 
2 thousand 625 crore compensation allocation for land acquisition of Pune Western Ring Road
Suhas Diwase IAS | आगामी निवडणुकीसाठी योग्य समन्वय व संवाद साधून कामे करा |  जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या सूचना

Pune Rain Update | पुणे आणि परिसरातील शाळा आज बंद राहणार | जिल्हाधिकारी यांचे आदेश

 

Pune Heavy Rain – (The Karbhari News Service) – हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने (रेड अलर्ट) या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. (Pune Rain Update)

 

खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.