Water cut in Pune on Thursday | येत्या गुरुवारी शहरातील विविध भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद!

HomeBreaking Newsपुणे

Water cut in Pune on Thursday | येत्या गुरुवारी शहरातील विविध भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद!

गणेश मुळे Jul 01, 2024 1:17 PM

 Emphasis of Pune Municipal corporation (PMC) Water Supply Department on breaking unauthorized taps 
Pune Water cut on Thursday | पुण्यातील या परिसरात गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद! 
Pune Water cut on Thursday | येत्या गुरुवारी पूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद!

Water cut in Pune on Thursday | येत्या गुरुवारी शहरातील विविध भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद!

Pune Water Cut – (The Karbhari News Service) – येत्या गुरुवारी शहरातील काही परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. (PMC Water Supply Department)
गुरूवार  रोजी खडकवासला जॅक्वेल (नवीन), नवीन पर्वती जलशुध्दीकरण केंद्र (५०० एम.एल.डी.), जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्याअंतर्गत पर्वती MLR टाकी परिसर, पर्वती HLR टाकी परिसर व पर्वती LLR टाकी परिसर, पर्वती टँकर पॉईंट, लष्कर जलकेंद्र, एस.एन.डी.टी. (एम.एल.आर.) परिसर व चतुश्रुंगी टाकी परिसर, वडगाव जलकेंद्र परीसर व भामा आसखेड जॅक्वेल येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या
कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी  पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-

पर्वती जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
पर्वती MLR टाकी परिसर :- गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ इ.
पर्वती HLR टाकी परिसर :- सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग-१ व २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर,
शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं ४२, ४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर,पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परीसर, धनकवडी परीसर, इत्यादी.
पर्वती LLR परिसर – शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, रोहन कृतिका व लगतचा परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर.
लष्कर जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग :- संपूर्ण हडपसर परिसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळे पडळ, बी.टी-कवडे रोड, भीमनगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, वानवडी, जगताप चौक परिसर, जांभूळकर मळा, काळेपडळ, हंडेवाडी रोड, महमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदय नगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बु, शेवाळवाडी, खराडी, वडगाव शेरी (पार्ट), संपूर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव, एनआयबीएम रोड, रेसकोर्स, इत्यादी लष्कर जलकेंद्राच्या अखत्यारीत येणारे संपूर्ण परिसर.
एस.एन.डी.टी. (एम.एल.आर.) व चतुथुंगी टाकी परिसर :- गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापिठ, लॉ कॉलेज रोड, महाबळेश्वर हॉटेल पर्यंत बाणेर रोड, बीएमसीसी कॉलेज रोड, आयसीएस कॉलनी भोसलेनगर, सेनापती बापट रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, चतुश्रृंगी टाकीवरुन पाणीपुरवठा होणारा बाधीत भाग, पौड रोड शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसा. भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी परिसर झोनिंग पध्दतीने, सहवास, क्षिप्रा, मनोहन सोसा. विठ्ठल मंदिर परिसर झोननिंग करून, गोसावी वस्ती परिसर, करिष्मा सोसायटी समोरील परिसर, बीग बाझार परिसर, बंधन सोसायटी परिसर, डी. पी. रस्ता (पार्ट), मयुर कॉलनी परिसर, मयुर डी. पी. रस्त्याची डावी ब्लाजु, कर्वेरोड झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्या पर्यंतचा भाग, दशभूजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पुलापर्यंत एच. ए. कॉलनी टिळेकर प्लॉट, भरतनगर अर्चनानगर, भरतकुंज, स्वप्नमंदीर, सुनिता, युको बँक कॉलनी, टैंकर पॉईट डि.पी. रस्ता मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, वकिलनगर इत्यादी, करिष्मा सोसा., ते वारजेवार्ड ऑफिस गिरीजा शंकर, नवसह्याद्री ताथवडे उद्यान परिसर निलकमल युनायटेड वेस्टर्न अनुरेखा स्थैर्य, मधूचय, शैलेश, अलंकार, मनिषा, स्वस्तिश्री, रघुकुल महिम्न, सुखा जयशक्ती, सविता सोसा, विठ्ठल मंदिर रस्त्यापर्यंत, म्हाडा कॉलनी, नेहरूनगर वसाहत, पाळंदे कुरियर, राहुलनगर, प्रीतमनगर इत्यादी. येवलेवाडी,
वडगाव जलकेंद्र परीसर :- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.
भामा आसखेड जलकेंद्र परिसर :- लोहगाव, विमाननगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा इत्यादी