Dr Kailas Kadam | महाभ्रष्ट सरकारचा तीव्र निषेध – डॉ. कैलास कदम  | युती सरकारच्या विरोधात काँग्रेसचे पिंपरीत ‘चिखल फेको’ आंदोलन

HomeपुणेBreaking News

Dr Kailas Kadam | महाभ्रष्ट सरकारचा तीव्र निषेध – डॉ. कैलास कदम  | युती सरकारच्या विरोधात काँग्रेसचे पिंपरीत ‘चिखल फेको’ आंदोलन

गणेश मुळे Jun 21, 2024 3:24 PM

Pune PMC Voting Awareness |  पुणे शहरात मतदानाचा टक्का वाढविण्याबाबत पुणे महापालिकेत आढावा बैठक 
Blood Donation Camp | दाभोलकरांच्या बलिदान दिनानिमित्त ६२ जणांचे रक्तदान | महा. अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेचा उपक्रम
Income Tax Return | करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी | आयकरातील सूट आणि कपात दूर करण्याची तयारी सुरू! | तुमच्या खिशावर परिणाम

Dr Kailas Kadam | महाभ्रष्ट सरकारचा तीव्र निषेध – डॉ. कैलास कदम  | युती सरकारच्या विरोधात काँग्रेसचे पिंपरीत ‘चिखल फेको’ आंदोलन

 

Pimpari Congress – (The Karbhari News Service) –  राज्यातील व केंद्रातील भाजप सरकार हे शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, युवक, महिला, गरिब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा विचार आदर्श मानणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात भाजप सरकार समाजामध्ये द्वेष पसरवण्याचे काम करीत आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचे काम या सरकारने केले आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिक या सरकारवर चिखल फेक करून सरकारचा तीव्र निषेध करीत आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.

शुक्रवारी (दि.२१) शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे युती सरकारच्या विरोधात प्रतिकात्मक चिखल फेक आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सरकार विरोधात निदर्शने केली.

यावेळी कविचंद भाट, अमर नाणेकर, विश्वनाथ जगताप, माऊली मलशेट्टी, विठ्ठल शिंदे, शामला सोनवणे, बाबू नायर, शहाबुद्दीन शेख, हरीश डोळस, बाबा बनसोडे, जुबेर खान, भाऊसाहेब मुगुटमल, सचिन कोंढरे, मयूर जयस्वाल, गौरव चौधरी, वसंत वारे, सोमनाथ शेळके, वाहब शेख, ॲड. अशोक धायगुडे, ॲड. अनिकेत रसाळ, उमेश बनसोडे, करीम पूनावाला, मिलिंद फडतरे, आकाश शिंदे, ॲड. अनिरुद्ध कांबळे, इरफान शेख, सुरज गायकवाड, अमरजीत पाथीवार, दाहर मुजावर, अण्णा कसबे, मोहन अडसूळ, विशाल कसबे, रशीद अत्तार, केनीथ रेमी, विजय ओव्हाळ, गौतम ओव्हाळ, मेहबूब शेख, रवी कांबळे, अबूबकर लांडगे, विकास कांबळे, फिरोज तांबोळी, पराग भुजबळ, राजू वाळुंजकर, सर्जी वकी, दिपल भंडारी, विद्यानंद सोनटक्के, ॲड. प्रथमेश कांबळे आदी उपस्थित होते.

डॉ. कैलास कदम म्हणाले की, मागील दहा वर्षापासून भाजपा सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खिळ घातली आहे. सरकारी नोकर भरती बंद केली आहे. स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत, ज्या परीक्षा घेतल्या त्यात पेपरफुटीचे ग्रहण लागते, शेतकरी संकटात आहे तरी त्यांना मदत दिली जात नाही. कांदा, कापूस, सोयाबीन यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाही. सरकार किमान हमीभाव देत नाही.

महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी, महिला सुरक्षा, खते, वि-बियाणांचा काळाबाजार, चिखलात सुरु असलेली पोलीस भरती, राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, श्रीमंतांची पोर गोरगरिबांना गाड्याखाली चिरडून मारत आहेत. तरुणींचे दिवसाढवळ्या रस्त्यावर खून पाडले जात आहेत. सत्ताधारी पक्षाकडून जाती धर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याकडे लक्ष देण्याऐवजी सरकार फक्त टेंडर काढणे, निधी वाटणे, कमिशन घेणे एवढेच काम करत आहे. राज्यातील महाभ्रष्ट, निष्क्रीय सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीत मतदार घरी पाठवणार आहेत असेही डॉ. कैलास कदम यांनी सांगितले.