Pune PMC News | कोरेगाव पार्क परिसरात अनधिकृत हॉटेल्स आणि बांधकामावर कारवाई | 46 हजार 500 चौ फूट बांधकाम हटवले 

HomeपुणेBreaking News

Pune PMC News | कोरेगाव पार्क परिसरात अनधिकृत हॉटेल्स आणि बांधकामावर कारवाई | 46 हजार 500 चौ फूट बांधकाम हटवले 

गणेश मुळे Jun 05, 2024 3:15 PM

Congress | Fuel price hike | हात गाडीवर पेट्रोल डिझेलचे बॅरल ठेवून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन
Chitrashrusthi | काँग्रेस पक्षाने देश उभारण्याचे काम अनेक वर्ष केलं परंतु गेली आठ वर्ष भाजपाने देश विकण्याचे काम केलं | नानाभाऊ पटोले
Honeytrap DRDO Scientist | DRDO Scientist Arrested for Providing Confidential Information to Pakistan

Pune PMC News | कोरेगाव पार्क परिसरात अनधिकृत हॉटेल्स आणि बांधकामावर कारवाई | 46 हजार 500 चौ फूट बांधकाम हटवले

Pune Municipal Corporation Latest News   – (The Karbhari News Service) – पुणे पेठ कोरेगाव पार्क येथील संगमवाडी टीपी स्कीम अंतिम भूखंड क्रमांक ४०५ येथे अनधिकृतरित्या विकसित करण्यात आलेल्या हॉटेल्स व इतर कच्च्या व पक्क्या स्वरूपाच्या बांधकामावर आज बांधकाम विकास विभाग झोन क्र. ४ कडून कारवाई करण्यात आली. या कारवाईत 46 हजार 500 चौ फूट बांधकाम हटवण्यात आले. अशी माहिती बांधकाम विकास विभागाकडून (PMC Building Development Department) देण्यात आली. (Pune Municipal Corporation (PMC)

या बांधकामास 31 डिसेम्बर रोजी नोटीस देण्यात आली होती. परंतु या नोटीस बाबत वादी यांनी मनपा कोर्टात दावा दाखल केला. या दाव्याबाबत  न्यायालयाचा निकाल प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेने लगेच कारवाई हाती घेतली व पूर्ण केली. परंतु वादी यांनी कारवाई झाल्यानंतर मे कोर्टाकडून स्टे घेतला. पुन्हा सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम विकसित करून नव्याने हॉटेल व इतर व्यावसायिक वापर चालू केले. याबाबत नागरिकांच्या तक्रारी देखील प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने सर्वांना ज्ञात करून व महापालिकेच्या विधी विभागा सोबत कायदेशीर बाबत सल्ला मसलत करून नव्याने विकसित केलेल्या बांधकामास नोटीस दिली व कारवाई केली.
त्या ठिकाणी करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकाम करून हॉटेलचा वापर चालू केला होता. जागेवर कोणतीही अग्निशमन प्रतिबंधक उपाययोजना व पार्किंगची सोय नसल्याने येथे सार्वत्रिक सुट्ट्या व सध्या वाहतुकीस अडथळा येत होता.  कारवाई सुरू करताना संबंधित व्यावसायिकांनी कारवाईस रोष दर्शविला.  त्यानुसार स्थानिक पोलीस यंत्रणा व संबंधित उपायुक्त पोलीस व सहाय्यक आयुक्त पोलीस यांना संपर्क साधला असता कायदेशीर बाबीमुळे कारवाई सुरू करण्यास विलंब झाला. परंतु नंतर पोलीस बंदोबस्तात कारवाई पूर्ण करण्यात आली. यासाठी जॉ-कटर, जेसीबी इत्यादी आधुनिक साधनांचा वापर करण्यात आला. या कारवाईसाठी उप अभियंता व बांधकाम विभागाकडील 13 सेवक वर्ग, अतिक्रमण विभागाचे पोलीस अधिकारी व एम एस एफ चे जवान  असे एकूण 1& सेवक, स्थानिक अधिकारी व पोलीस कर्मचारी असे एकूण 22 सेवक उपयोगी पडले.