PMC Pune Office Timing | कार्यालयीन वेळेचे काटेकोरपणे पालन करा नाहीतर कारवाईला सामोरे जा!   | महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांचा महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना इशारा

HomeBreaking Newsपुणे

PMC Pune Office Timing | कार्यालयीन वेळेचे काटेकोरपणे पालन करा नाहीतर कारवाईला सामोरे जा! | महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांचा महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना इशारा

गणेश मुळे Jun 05, 2024 3:06 AM

PMC commissioner gave strict instructions to the officials in the meeting of HODs
Dr Kunal Khemnar IAS | Prithviraj B P IAS | अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार यांची बदली! | पृथ्वीराज बी पी पुणे महापालिकेचे नवीन अतिरिक्त आयुक्त
PMC Disclosure of specified information | महापालिकेच्या सर्व विभागांची माहिती अद्ययावत करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश | आयुक्तांनी घेतला आढावा

PMC Pune Office Timing | कार्यालयीन वेळेचे काटेकोरपणे पालन करा नाहीतर कारवाईला सामोरे जा!

| महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांचा महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना इशारा

PMC Office Timing- (The Karbhari News Service) – महापालिका कर्मचारी (PMC Employees) आणि अधिकारी (PMC Officers) कार्यालयीन वेळेचे पालन करताना दिसून येत नाहीत. दुपारी जेवणाच्या सुट्टीनंतर कर्मचारी समूहाने फिरताना दिसतात. वेळ टळून गेली तरी कार्यालयात येत नाहीत. तसेच कार्यालयात सकाळी उशिरा येतात आणि सायंकाळी लवकर निघून जातात. ही बाब महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी गंभीरपणे घेतली आहे. त्यामुळे आयुक्तांनी नियमावली ठरवून दिली आहे. तिचे पालन न झाल्यास कारवाई करण्याचा इशारामहापालिका आयुक्तांनी दिला आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
पुणे महानगरपालिका प्रशासकीय कार्यालये व विभाग यांचेसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व अधिकारी, कर्मचारी यांना कार्यालयीन कामकाजाची वेळ (कार्यालय सुरु होण्याची प्रत्यक्ष वेळ सकाळी ०९.४५ व सुटण्याची वेळ सायंकाळी ०६.१५) निश्चित केलेली आहे. तर  दुपारी ०२.०० ते ०२.३० ही अर्धा तास भोजनाची मुट्टी नेमून दिलेली आहे. (Pune PMC News)

पुणे महानगरपालिका सेवा विनियमामधील ‘नगरपालिका कर्मचाऱ्यांचे वर्तणूक नियम यातील नियम क्र. २८ आणि २९ नुसार प्रत्येक नगरपालिका कर्मचाऱ्याने कार्यालयात वक्तशीरपणे हजर राहाणे, नेमून दिलेले काम कार्यालयीन वेळेमध्ये इमानाने व प्रामाणिकपणे करणे, सहकाऱ्यांबरोबर अनावश्यक बडबड न करणे, गटागटाने चर्चा न करणे. असे वर्तन सर्व कर्मचाऱ्यांकडून होणे अभिप्रेत व आवश्यक आहे. कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहून कामकाज करणे ही प्रत्येक कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यानुसार सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहून कामकाज करणे आवश्यक आहे. याबाबत यापूर्वी वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत.
मात्र  भोजनाची दुपारी २.३० ची वेळ संपल्यानंतर महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये तसेच क्षेत्रिय स्तरावरील कार्यालयांमध्ये काही कर्मचारी हे आपापल्या जागेवर कामासाठी उपलब्ध न होता समुहाने फिरताना, चर्चा करताना दिसतात. तसेच कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वीच कार्यालयातून निघून जात असल्याचे निदर्शनास येत आहेत. ही बाब नागरिकांकडून तसेच विविध समाज माध्यमांमधून देखील निदर्शनास आणलेली आहे. कर्मचाऱ्यांची अशी वर्तणूक ही प्रशासकीय दृष्ट्या योग्य नाही. त्यामुळे आयुक्तांनी एक नियमावली ठरवून दिली आहे.

अशी आहे नियमावली

१) सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येणे जाणेकरिता कार्यालयीन आदेशान्वये
नेमून दिलेल्या कार्यालयीन वेळेचे काटेकोरपणे पालन करावे.
२) कार्यालयीन वेळेमध्ये कार्यालय इमारतीमध्ये व इतरत्र कोठेही न फिरता आपापल्या जागेवर उपस्थित राहून कामकाज करावे.
३) कार्यालयीन आदेशामध्ये निश्चित केल्याप्रमाणे भोजनाच्या वेळा पाळाव्यात. त्यानंतर प्रत्येक कर्मचारी त्याच्या नियुक्त केलेल्या जागेवर उपस्थित असणे आवश्यक आहे.
४) कर्मचारी हे आपापल्या जागेवर उपस्थित राहून कामकाज करतील याबाबत संबंधित कार्यालय प्रमुख / खातेप्रमुख यांनी दक्षता घ्यावयाची आहे. अभियांत्रिकी संवर्गातील तसेच अन्य अधिकाऱ्यांना शासकीय कामासाठी बाहेर जाताना हलचाल नोंदवहीत नोंद करण्याबाबत सूचना कराव्यात.
५) सकाळी लवकर कार्यालयीन वेळेपूर्वी जागा पाहणी करिता गेल्यास त्याबाबत आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात यावी. तसेच तेथून आल्यानंतर त्यानुसार हलचाल नोंदवहीत नोंद करण्यात यावी.
६) सर्व खातेप्रमुख व वरिष्ठ अधिकारी यांनी नागरिकांना भेटण्याची वेळ निश्चित करून त्यानुसार त्याबाबतची माहिती त्यांचे कक्षाच्या बाहेर दर्शनी भागात व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने लावावी.
७)  सर्व अधिकारी / कर्मचारी हे कामकाजाच्या वेळांचे पालन करतात किंवा कसे, याबाबत सर्व खातेप्रमुख यांनी त्यांचे स्तरावर आढावा घ्यावा. कामकाजाच्या वेळांचे पालन न करणाच्या अधिकारी व कर्मचारी यांचेवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात यावी.