Pune Property tax 40% Discount | मिळकत करात 40% सवलत देण्यासाठी पुणे महापालिकेकडून तपास मोहीम सुरु!

HomeपुणेBreaking News

Pune Property tax 40% Discount | मिळकत करात 40% सवलत देण्यासाठी पुणे महापालिकेकडून तपास मोहीम सुरु!

गणेश मुळे May 07, 2024 2:33 AM

2273 crore collected in the coffers of Pune Municipal Corporation from property tax
Madhav Jagtap PMC | महापालिका प्रॉपर्टी टॅक्स विभागचा अतिरिक्त पदभार उपयुक्त प्रतिभा पाटील यांच्याकडे!
  15 days extension for citizens to pay property tax at discount!  |   Decision of PMC Property Tax Department

Pune Property tax 40% Discount | मिळकत करात 40% सवलत देण्यासाठी पुणे महापालिकेकडून तपास मोहीम सुरु!

| नागरिकांकडून PT-3 form भरून घेतला जाणार

Pune Property tax 40% Discount- (The Karbhari News Service) – पुणे शहरातील स्व-वापराच्या निवासी मिळकतींना मिळकत करात ४०% सवलतीच्या अनुषंगाने पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation (PMC) तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. सोमवारी 1100 मिळकतीची तपासणी झाली. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांनी दिली. (PMC Property tax Department)

पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील स्व-वापराच्या निवासी मिळकतीस ४०% सवलतीच्या अनुषंगाने वडगाव धायरी, वडगाव बुद्रुक व हिंगणे या भागात प्रायोगिक तत्वावर 6 मे पासून भेट देण्यात येत आहे.  मिळकतधारक स्वतः राहत असल्यास, त्यांचेकडून ४०% सवलतीचा PT-3 form नागरिकांना हस्तांतरित करण्यात येत आहे. त्याच बरोबर माहिती संकलित करण्यात येत आहे. मिळकतधारक स्वतः राहत असल्यास, याबाबत मिळकतधारकांनी form भरताना सादर केलेल्या कागद पत्रानुसार तपासणी करण्यात येत असून, सोमवार रोजी ११०० इतक्या मिळकतींची तपासणी करण्यात आलेली आहे.
याकरिता ५ विभागीय निरीक्षक, १० पेठ निरीक्षकांचे पथक तयार करण्यात आले असून, रवींद्र धावारे, प्र. प्रशासन अधिकारी, हे पथक प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. असे मिळकतकर विभागाकडून सांगण्यात आले.