MLA Sunil Tingre | अखेर शास्त्रीनगर चौकातील फ्लायओव्हर व ग्रेड सेपरेटर चा मार्ग मोकळा   | पुरात्वत विभागाची एनओसी मिळाली

HomeBreaking Newsपुणे

MLA Sunil Tingre | अखेर शास्त्रीनगर चौकातील फ्लायओव्हर व ग्रेड सेपरेटर चा मार्ग मोकळा | पुरात्वत विभागाची एनओसी मिळाली

गणेश मुळे May 03, 2024 2:12 PM

MLA Fund | Sunil Tingre | सोसायट्यांमध्ये होणार आता आमदार निधीतून विकासकामे
MLA Sunil Tingre | सिध्दार्थनगर वासियांच्या घरांसाठी सहा पर्याय! | महापालिका आयुक्तांचा प्रस्ताव | आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश
Yerwada, Kalas, Dhanori : MLA Sunil Tingre : पुराचे पाणी शिरु नये यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांवर अमल करावा : आमदार सुनिल टिंगरे यांचे निर्देश

MLA Sunil Tingre | अखेर शास्त्रीनगर चौकातील फ्लायओव्हर व ग्रेड सेपरेटर चा मार्ग मोकळा

 | पुरात्वत विभागाची एनओसी मिळाली

  | आमदार सुनील टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश

Nagar Road Traffic – (The Karbhari News Service) – नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नांना आणखी एक यश आले आहे. शास्त्रीनगर ( येरवडा) येथील उड्डाणपुल व ग्रेडसेपरेटरच्या कामासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या पुरात्वत विभागाने महापालिकेला ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे या रखडलेल्या पुलाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार सुनिल टिंगरे यांनी ही माहिती दिली.

नगर रस्त्यावर प्रामुख्याने येरवडा ते वाघोली दरम्यान वाहतुक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी नगर शास्त्रीनगर आणि खराडी बायपास येथे उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरसाठी महापालिकेच्या  अंदाजपत्रकात निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यात नगर रस्त्यावरील दुमजली उड्डाणपूल थेट विमानगरपर्यंत आणण्यात आमदार टिंगरे याना यश आल्याने खराडातील उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागला. मात्र, शास्त्रीनगर जवळ असलेल्या आगाखान पॅलेसही राष्ट्रीय स्मारक असल्याने येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी आवशयक असलेली पुरात्वत विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र ( एनओसी) बधनकारक आहे. ही एनओसी मिळत नसल्याने या पुलाचे काम रखडले होते. यासंदर्भात आमदार टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्यास यश मिळाले असून केंद्र सरकार व राज्य सरकारची एनओसीची  कार्यवाही प्रक्रिया पूर्ण होऊन अखेर दि. २ मे ला यासंबंधीची एनओसी महापालिकेला दिली असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर या कामाला सुरवात होईल.

 

——

नगर रोड परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या साडेचार वर्षापासून पाठपुरावा करीत आहे. त्यात नगर रस्त्यावर शिरूर ते वाघोली पर्यंत होणारा दुमजली उड्डाणपूल आपण थेट रामवाडीपर्यंत आणण्यासाठी पाठपुरावा केला आणि त्याला यश आले. तसेच येरवडा ते विमानगरपर्यंत बीआरटी काढल्याने कोंडी सुटली आहे. आता पुरातत्व विभागाची एनओसी मिळाल्याने शास्त्रीनगर येथील उड्डाणपूल व ग्रेडसेप्रेटरच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. ही कामे पूर्ण झाल्यावर निश्चितपणे नगर रस्ता कोंडीमुक्त आणि सिग्नल मुक्त होईल.

सुनील टिंगरे (आमदार, वडगाव शेरी मतदारसंघ)