Dr Kunal Khemnar IAS | Prithviraj B P IAS | अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार यांची बदली! | पृथ्वीराज बी पी पुणे महापालिकेचे नवीन अतिरिक्त आयुक्त
Prithviraj B P IAS | Dr Kunal Khemnar – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहणारे डॉ कुणाल खेमनार (Dr Kunal Khemnar IAS) यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राज्य सरकारने महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी पृथ्वीराज बी पी (Prithviraj B P IAS) यांची नियुक्ती केली आहे.
डॉ खेमनार यांचा कालावधी पूर्ण होऊन बराच कालावधी झाला होता. अखेर सरकारने त्यांची बदली केली आहे. डॉ खेमनार यांची सरकारने साखर आयुक्त, पुणे या ठिकाणी बदली केली आहे. त्यामुळे डॉ खेमनार हे पुण्यातच राहणार आहेत. खेमनार यांनी त्यांच्या कालावधीत घनकचरा विभाग आणि प्रॉपर्टी टॅक्स विभागात बऱ्याच नवीन कल्पना राबवून महापालिकेला अग्रेसर बनवण्याचे काम केले आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
दरम्यान डॉ खेमनार यांची जागा रिक्त झाल्यानंतर राज्य सरकारने पुणे महापालिकेला तात्काळ नवीन अतिरिक्त आयुक्त दिले आहेत. सरकारने पृथ्वीराज बी पी यांची पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती केली आहे. पृथ्वीराज हे नागपूर स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते.
दरम्यान सरकारने नुकतीच महापालिका आयुक्त पदी डॉ राजेंद्र भोसले यांची नियुक्ती केली आहे. विक्रम कुमार यांच्या जागी डॉ भोसले यांना नियुक्त करण्यात आले आहे.