PMC Health Department | कायाकल्प प्रकल्पात पुणे महानगरपलिका सर्वोत्कृष्ट

HomeBreaking Newsपुणे

PMC Health Department | कायाकल्प प्रकल्पात पुणे महानगरपलिका सर्वोत्कृष्ट

गणेश मुळे Mar 15, 2024 3:30 PM

Dr Bhagwan Pawar Suspension | पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख म्हणून डॉ भगवान पवार यांचे निलंबन! | राज्य सरकारकडून कारवाई 
PMC CHS Health Scheme | अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेच्या औषध बिलांबाबत आरोग्य विभागाकडून नवीन नियमावली
PMC Employees Health Check Up | महापालिका कर्मचाऱ्यांची आज मधुमेह, उच्च रक्तदाब व मुखकर्करोग ची तपासणी | आभा कार्ड आज आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढले जाणार

PMC Health Department | कायाकल्प प्रकल्पात पुणे महानगरपलिका सर्वोत्कृष्ट

PMC Kayakalp Project- (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत (Pune Municipal Corporation (PMC) राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाच्या (NUHM) माध्यमातून विविध आरोग्य विषयक राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्यात येतात. यामध्ये स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये पुणे महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य संस्थांमध्ये कायाकल्प कार्यक्रम (Kayakalp Project) राबविण्यात आला होता. यात पुणे महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांनी (PMC Primary Health Centers) बाजी मारली आहे. अशी माहिती आरोग्य प्रमुख डॉ भगवान पवार (Dr Bhagwan Pawar PMC) यांनी दिली. (Pune Municipal Corporation Health Department)
“कायाकल्प कार्यक्रमांतर्गत आरोग्य संस्थांमार्फत देण्यात येणाऱ्या गुणवत्ता पूर्ण सेवांसोबतच रुग्णालयाची स्वच्छता, संसर्ग नियंत्रण इ. बाबींवर मुख्यतः काम करण्यात येते. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी दरम्यान प्रत्येक संस्थांचे संस्थास्तरीय परीक्षण समिती मार्फत करण्यात येते. अंतिम परीक्षण पार पाडल्यानंतर प्राथमिक आरोग्य संस्था आणि प्रसुतीगृहांना, महानगरपालिका तसेच राज्य स्तरावर उत्कृष्ट काम केलेल्या आरोग्य संस्थांना बक्षीस देण्यात येतात.

आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये सदर कार्यक्रमांतर्गत पुणे महानगरपालिकेमधील १८ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे यांनी रक्कम रुपये १२.०० लक्ष (अक्षरी रुपये बारा लाख रुपये) चे बक्षीस मिळवले असून त्यापैकी कै. प्रेमचंद ओखाल नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रथम क्रमांकाचे बक्षीस रक्कम रुपये २,००,०००/- लक्ष (अक्षरी रुपये दोन लाख रुपये) राज्यसरकारकडून घोषित झाले आहे. याकरिता मा. प्रशासक तथा आयुक्त पुणे महानगरपालिका, मा. अति.आयुक्त श्री. रवींद्र बिनवडे, आरोग्य अधिकारी, मा. डॉ. भगवान पवार. सहा. आरोग्य अधिकारी, डॉ. वैशाली जाधव. नोडल अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर चकोर पुणे महानगरपालिका यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, डॉ. दिपाली क्षीरसागर व शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक, डॉ. विणाक्षी वैद्य पुणे महानगरपालिका तसेच संबंधित प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले आहेत.

 

पारितोषिक पात्र आरोग्य संस्था आणि मिळालेली रक्कम

1. स्व. प्रेमचंद ओसवाल दवाखाना – २,००,०००/-

2.  गं.भा. इंदुमती मणिलाल खन्ना दवाखाना- १,५०,०००/- –

3. पुणे मनपा दवाखाना, कात्रज – १,००,०००/–

4. कै. मुकुंदराव लेले दवाखाना – ५०,०००/-
5. कै. रोहिदास किराड दवाखाना – ५०,०००/–

6. डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र – ५०,०००/–

7. स्व.मुरलीधर पांडुरंग लायगुडे रुग्णालय – ५०,०००/–

8. कै. कलावतीबाई मावळे दवाखाना – ५०,०००/–
Commendation –

9. बाणेर स्मार्ट क्लिनिक – ५०,०००/-

10. कै. बापूसाहेब गेणुजी कवडे पाटील – ५०,०००/-

11.  कै. सुंदराबाई गणपत राऊत दवाखाना – ५०,०००/-
12. कै. जंगलराव कोंडीबा अमराळे दवाखाना  – ५०,०००/-

13. स्व.गोटीराम भैय्या काची पॉलीक्लिनिक – ५०,०००/-
14. कै. बिंदू माधव ठाकरे दवाखाना – ५०,०००/- ^

15. कै. अरविंद गणपत बारटक्के दवाखाना – ५०,०००/-

16. कै.विजयाबाई शिर्के आरोग्य केंद्र – ५०,०००/-

17. कै. बाळाजी रखमाजी गायकवाड दवाखाना  – ५०,०००/-

18. कै. विष्णू यशवंत थरकुडे दवाखाना / ५०,०००/-