Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी रद्द करा | मराठा क्रांती मोर्चाची मागणी 

HomeपुणेBreaking News

Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी रद्द करा | मराठा क्रांती मोर्चाची मागणी 

गणेश मुळे Mar 01, 2024 3:21 PM

CM Devendra Fadnavis | शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Good Governance Rules |  Maharashtra | देशातील वैशिष्ट्यपूर्ण अशा सुशासन नियमावलीस मुख्यमंत्र्यांची मान्यता
Lahuji Vastad Salve Smarak | आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी रद्द करा | मराठा क्रांती मोर्चाची मागणी

 

Pune – (The karbhari Online) – मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha quota activist Manoj Jarange Patil) केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून एसआयटी चौकशीची आदेश देण्यात आले आहेत. मात्र ही एसआयटी चौकशी रद्द करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चा पुणे (Maratha Kranti Morcha Pune) शहराच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.

निवेदनानुसार मराठा समाजास ओ बी सी प्रवर्गातून आरक्षण तसेच सगेसोय-यांची अंमलबजावणी याबाबत केलेल्या आंदोलनानंतर, राज्य सरकारने ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायचे सोडून स्वतंत्र एस ई बी सी प्रवर्ग करून १० टक्के आरक्षणाचा कायदा मंजूर केला. यामुळे मराठा समाजाची दिशाभूल झाली. असे असताना व आंदोलन करणं हा हक्क असताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर राज्य सरकारकडून एसआयटी चौकशी चे आदेश देण्यात आले.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत . जरांगेपाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर दिलगीरी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात शांतता रहावी याची काळजी सर्वांनी घ्यायची आहे. परंतु सत्तेत सहभागी असलेले अनेक नेते मंत्री/आमदार यांचेकडून महाराष्ट्रामध्ये चुकीच्या पद्धतीने दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल तसेच एकमेकांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रभर चुकीचे संदेश जातात,अशा नेत्यांवर देखील एसआयटी चौकशी का नेमली नाही असा प्रश्न समाजामध्ये निर्माण होत आहे.
तरी मुख्यमंत्री यांनी याचा फेरविचार करून सदर चौकशी मागे घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक राजेंद्र कुंजीर अनिल ताडगे ,सचिन आडेकर ,संतोष नानवटे अर्जुन जाधव यांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना निवेदन दिले.