PMC Solid Waste Management | स्वच्छतेचं दैनंदिन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यामुळेच महापालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार | आयुक्त विक्रम कुमार 

Homeपुणेsocial

PMC Solid Waste Management | स्वच्छतेचं दैनंदिन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यामुळेच महापालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार | आयुक्त विक्रम कुमार 

गणेश मुळे Feb 22, 2024 3:29 AM

PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने जानेवारी महिन्यात वसूल केला ६० लाखाचा दंड!
PMC Solid Waste Management Special Scod Vehicle | स्पेशल स्कॉड व्हेईकल चा दुहेरी फायदा : कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढलं.. कर्मचारी गांधीगिरी करू लागले… आणि लोकांमध्ये जनजागृती होऊ लागली
Order of PMC Deputy Commissioner to enforce fine of Rs.500

PMC Solid Waste Management | स्वच्छतेचं दैनंदिन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यामुळेच महापालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार | आयुक्त विक्रम कुमार

PMC Solid Waste Management | सर्व क्षेत्रीय कार्यालयामधील हद्दीत दैनंदिन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळेच स्वच्छता पुरस्कार महापालिकेला मिळाला आहे. पुढील काळामध्ये महापालिका स्वच्छ सर्वेक्षण मध्ये भारतात प्रथम तीन क्रमांकामध्ये येईल. असा विश्वास महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar PMC Commissioner) यांनी व्यक्त केला.
तसेच त्यासाठी लागणारी यंत्रणा/सुविधा आवश्यक असल्यास प्राधान्याने उपलब्ध करून देणेबाबत आयुक्तांनी आश्वासित केले. (Pune Municipal Corporation Solid Waste Management Department)
पुणे महानगरपालिका, घनकचरा व्यवस्थापन कार्यालयामार्फत “स्वच्छता विषयक कार्यशाळा व सत्कार समारोह” आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयुक्त बोलत होते.
The karbhari - pmc solid waste management department

स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत आयोजित स्पर्धेमध्ये पुणे शहराला लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये भारतात १० क्रमांकाचे मानांकन व १० लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ९ क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे Garbage Free City (GFC) अंतर्गत ५ स्टार मानांकनाने हरदीप सिंग पुरी, कॅबिनेट मंत्री MoHUA व मनोज जोशी, सचिव, MoHUA यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त,  विक्रम कुमार, मअतिरिक्त महापालिका आयुक्त (इ), डॉ. कुणाल खेमनार व घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख, उप आयुक्त, संदिप कदम यांनी पुरस्कार स्वीकारला.
महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी केलेले अथक परिश्रम, नागरिकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद व स्वयंसेवी संस्था या सर्वांचे सांधिक प्रयत्न व नाविन्यपूर्ण प्रकल्पाच्या अंतर्भाव, या मुळे हा सन्मान प्राप्त झाला आहे. पुढील काळात लोकसहभागातून स्वच्छतेसाठी महापालिका आणखी प्रयत्न करेल असे मत त्यावेळी श्री विक्रम कुमार, आयुक्त, पुणे
महानगरपालिका यांनी व्यक्त केले होते.
या अनुषंगाने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत बुधवार रोजी स. ११:०० ते सायं ०४:०० या वेळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, गंजपेठ, पुणे या ठिकाणी स्वच्छता विषयक कार्यशाळा व सत्कार समारोह चे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेस मा. महापालिका आयुक्त, श्री. विक्रम कुमार व मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ), डॉ. कुणाल खेमनार, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि), श्री. विकास ढाकणे, उप आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन श्री. संदीप कदम व तसेच माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त, श्री. सुरेश जगताप आणि श्री. ज्ञानेश्वर मोळक देखील उपस्थित होते. स्वच्छ सर्वेक्षण चे ब्रँड अॅम्बॅसडर, टेनिसपटू ऋतुजा भोसले देखील उपस्थित होते.
या प्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त, श्री. संदीप कदम यांनी प्रास्ताविक केले. मा. महापालिका आयुक्त, श्री. विक्रम कुमार यांनी सर्व अधिकाऱ्यांचे / कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ), डॉ. कुणाल खेमनार, माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त, श्री. सुरेश जगताप आणि श्री. ज्ञानेश्वर मोळक यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले.
तसेच “मनाची अमर्याद शक्ती व तणावमुक्ती” या विषयावर डॉ. दत्ता कोहिनकर माईड पॉवर ट्रेनर यांनी व्याख्यान दिले.
तसेच स्वच्छताविषयक कामकाज करणारे अधिकारी / कर्मचाऱ्यांचा / क्षेत्रीय कार्यालय / मुख्य विभाग यांना महापालिका आयुक्त यांच्या हस्ते गौरव चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.