Maratha Samaj Survey in Pune City | Pune PMC | मराठा समाज व खुल्या  प्रवर्गातील नागरिकाचे सर्वेक्षण करण्याबाबत पुणे महापालिकेने पुणेकरांना केले हे आवाहन | जाणून घ्या सविस्तर!

HomeपुणेBreaking News

Maratha Samaj Survey in Pune City | Pune PMC | मराठा समाज व खुल्या  प्रवर्गातील नागरिकाचे सर्वेक्षण करण्याबाबत पुणे महापालिकेने पुणेकरांना केले हे आवाहन | जाणून घ्या सविस्तर!

गणेश मुळे Jan 23, 2024 12:49 PM

Hemant Rasne | हेमंत रासने यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका!
Exit polls | एक्झ‍िट पोल प्रसारित अथवा प्रकाशित करण्यास प्रतिबंध
PMC Recruitment Exam Result | पुणे महापालिकेकडून घेण्यात आलेल्या या परीक्षांचे निकाल जाहीर | १७ ऑक्टोबर ला कागदपत्रांची छाननी  | जाणून घ्या सविस्तर 

Maratha Samaj Survey in Pune City | Pune PMC | मराठा समाज व खुल्या  प्रवर्गातील नागरिकाचे सर्वेक्षण करण्याबाबत पुणे महापालिकेने पुणेकरांना केले हे आवाहन | जाणून घ्या सविस्तर!

 

Maratha Samaj Survey in Pune City| Pune PMC | मंगळवार (23 जानेवारी) पासून महाराष्ट्रात मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे (State Commission for Backward Classes) यासंदर्भातील सूचना प्रकाशित करण्यात आलेली असून. 23 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या आठ दिवसांच्या काळात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील लोकांच्या घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. (Pune Municipal Corporation News)

याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे व सहकार्यासाठी आवाहन करणे गरजेचे आहे. या कामासाठी  महाराष्ट्र  शासनाने महाराष्ट्र  राज्य मागासवर्ग  आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे  काम सोपवले आहे. त्यानुसार पुणे शहरामध्ये  देखील मराठा समाज व खुल्या  प्रवर्गातील नागरिकाचे सर्वेक्षण  होत आहे.   सर्वेक्षण  २३ ते ३१ जानेवारी  या कालावधीत पुणे मनपा (Pune Municipal Corporation) मार्फत नियुक्त केलेल्या  २००७ प्रगणकामार्फत पूर्ण करण्यात  येणार आहे. सदरील  सर्वेक्षण  मनपा हद्दीतील घरोघरी जाऊन मोबाईल ॲप वर livedata entry मार्फत  करण्यात  येणार आहे. (Pune PMC News)

याबाबत पुणे महापालिकेने पुणेकरांना आवाहन केले आहे.   महापालिकेने  म्हटले आहे कि, यादरम्यानच्या  कालावधीत आपण घरी उपस्थित  राहून सर्वेक्षणासाठी येणाऱ्या मनपाच्या प्रगणकास माहिती देऊन सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे.

  • पुणे महापालिकेचा प्रगणक कसा ओळखाल?

सदरील प्रगणकाकडे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेले ओळखपत्र असणार आहे. तसेच सर्वेक्षणासाठी  भेट दिलेल्या  या घरावर MSBCC या पद्धतीची निशाणी नोंदविणार आहे.